मुंबई: ज्येष्ठ चित्रपट निर्माते यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाचे (IFFI) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 'मिस्टर इंडिया', 'बँडिट क्वीन', 'एलिझाबेथ' यांसारख्या चित्रपटांसाठी ते विशेष लोकप्रिय आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६व्या आवृत्तीसाठी कपूर महोत्सव प्रमुख असतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडियावरही पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहेया अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, 'सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६ व्या आवृत्तीसाठी श्री. शेखर कपूर यांची महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे'. कपूर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याविषयी आनंद व्यक्त केला. हा एक सन्मान असल्याचे ते म्हणाले.
हा एक सन्मान आहे- शेखर कपूर
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक्स पोस्ट शेखर कपूर यांनीही शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी मंत्रालयाला टॅग केले आहे आणि असे लिहिले की, 'हा एक सन्मान आहे. ही एक वचनबद्धता आहे. ही एक जबाबदारी आहे. मला तुमच्या विश्वासासाठी पात्र समजल्याबद्दल धन्यवाद'.भारतीय सिनेविश्वासह हॉलिवूडमध्येही कमावले नाव
७८वर्षीय शेखर कपूप हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावशाली नाव आहे. त्यांनी हॉलिवूडमध्ये नाव प्रस्थापित करणाऱ्या भारतीय दिग्दर्शकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागतील. याकरता 'एलिझाबेथ' आणि या सिनेमाचा सीक्वेल 'एलिझाबेथ: द गोल्डन एज'चा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. याशिवाय बॉलिवूडमध्ये त्यांचे 'मासूम', 'मिस्टर इंडिया' आणि 'बँडिट क्वीन' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडेच त्यांनी 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू इट?' हा ब्रिटिश कॉमेडी दिग्दर्शित केला होता.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/BSAsi2G
No comments:
Post a Comment