पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयाने सुरुवात केली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला. ०-१ ने पिछाडीवर असूनही भारताने शानदार विजय मिळवला. आता या विजयामुळे भारताचे ३ गुण झाले आहेत. भारतासाठी हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल करत भारताला शानदार विजय मिळवून दिला.भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पॅरिस ऑलिम्पिकमधील हॉकी सामना पूर्वार्धात खूपच रोमांचक झाला. किवी संघाने वेगवान सुरुवात केली आणि नंतर भारतीय संघानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. पहिला क्वार्टर न्यूझीलंडच्या नावावर होता. किवी संघाने सुरुवातीलाच भारतीय संघाला दडपणाखाली ठेवले होते. सामन्याच्या आठव्या मिनिटाला किवी संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि सॅम लेनने त्याचा पुरेपूर फायदा उठवत संघासाठी पहिला गोल करत आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघ प्रयत्न करण्याशिवाय काही करू शकला नाही. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना किवी संघाला डीच्या आत अडकवून पेनल्टी कॉर्नर जिंकला. यावेळी भारताची तयारी पूर्ण झाली आणि २४व्या मिनिटाला मनदीपने बॉक्समध्ये चेंडू टाकून भारतासाठी गोल केला आणि गुणसंख्या बरोबरीत आणली. पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताने न्यूझीलंडविरुद्ध जोरदार प्रतिआक्रमण केले. ब गटातील सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध ८व्या मिनिटाला सलामीचा गोल केला. किवी खेळाडू सॅम लॅनने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने गोल केला. पहिल्या क्वार्टरच्या १०व्या मिनिटाला गुरजंत सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. हा सामना जिंकून भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.भारतीय संघाने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये अधिक चुकीचे पास दिले. मात्र, नंतर टीम इंडियाने पुनरागमन केले. पहिल्या दोन क्वार्टरचा खेळ संपल्यानंतर स्कोअर १-१ असा बरोबरीत आहे. भारतासाठी मनदीप सिंगने पेनल्टीच्या मदतीने गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये विवेक सागरने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने रेफरल घेतला पण त्याचा फायदा झाला नाही. किवी संघाच्या वतीने सायमन चाइल्डने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. भारतीय संघ आघाडीच्या शोधात होता. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होता. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल करत भारताला थरारक विजय मिळवून दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/LrRvWOk
No comments:
Post a Comment