कोल्हापूर (नयन यादवाड): बदलापूर येथे मुलींवर झालेल अत्याचार आणि यातून पेटून उठलेला महाराष्ट्र हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्ये देखील माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. करवीर तालुक्यातील शिये गावात मामानेच 10 वर्षीय अल्पवयीन अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात वाढ झाली असून आधी कोलकाता, मग बदलापूर आणि आता कोल्हापूर यामुळे स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील शिये गावात असलेल्या राम नगर परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कुटुंबात मामानेच बहिणीच्या 10 वर्षीय लहान चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून खून केला आहे. ही अल्पवयीन मुलगी बुधवारी 21 ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र बुधवारी शोध घेऊन देखील मुलगी सापडली नाही. दरम्यान आज सकाळ पासूनच पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती. दुपारच्या सुमारास श्वान पथकाने मुलीचा मृतदेह त्यांच्याच घरापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातून शोधून काढला आणि शव विच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. मृतदेह मिळालेल्या घटनास्थळी मुलीचे अंतरवस्त्र आणि चप्पल बाजूला पडलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत फॉरेन्सिक एक्सपर्टद्वारे घटनास्थळावरील सर्व नमुने घेऊन तपास सुरू केला. तर परिसरातील नऊ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्यातील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दुपारपासून या संशयितांची कसून चौकशी केली असता पीडित मुलीच्या घरी गेल्या तीन महिन्यापासून नोकरी निम्मित राहत असलेला पीडित मुलीच्या मामा संशयित आरोपी दिनेश सहा वय वर्ष 25 याने काल सकाळी पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेल्या नंतर पीडित मुलीसह पाच भावंड संशयित आरोपीसह घरी वास्तव्यास होते. दुपारी अडीचच्या सुमारास संशयित आरोपीने पीडितेस घरापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला यावेळी पिढीतेने आवाज केल्याने तिचा गळा दाबून निर्घृण खून केला असल्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे कोल्हापुरात एकच संतापाची लाट उसळली असून मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या आठ तासात संशयित आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आला आहे. संशयित आरोपीला शिरोली एमआयडीसी पोलीसानी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/m5Br1Cs
No comments:
Post a Comment