नवी : महिलांसाठी देशातील वातावरण असुरक्षित बनत चालल्याचे अजून एक उदाहरण आता विनेश फोगटने दिले आहे. लैंगिक शोषण प्रकरणी विनेश फोगटने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण आहे तरी काय....
भारतीय महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैगिंक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयात ब्रिजभूषण यांच्याविरोधात ज्या महिला कुस्ती खेळाडू साक्षीदार आहेत, त्यांच्या सुरक्षेबाबत विनेशने धक्कादायक खुलासा केला आहे.विनेश फोगटने नेमका काय आरोप केला आहे...
विनेश फोगटने म्हटले आहे की, " ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात महिला खेळाडू साक्ष देण्यास तयार आहेत. पण या मार्गात आता काही अडथळे निर्माण केले जात आहेत. कारण ज्या महिला खेळाडू ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात साक्ष देण्यास तयार झाल्या आहेत, त्याची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढली आहे. त्यामुळे आता सुरक्षेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण ज्या महिला साक्ष देणार आहेत, त्यांना सुरक्षेची गरज आहे. पण ज्या महिला खेळाडू साक्ष देण्यास तयार आहेत, त्यांची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढलेली आहे. "दिल्ली पोलिसांनी काय म्हटले आहे....
दिल्ली पोलिसांनी विनेशच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे यावेळी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी विनेश फोगटच्या आरोपांवर म्हटले आहे की, " ज्या महिला खेळाडूंना सुरक्षा देण्याता आली आहे, ती कायम आहे. कोणाचीही सुरक्षा काढण्याचे आदेश आम्हाला दिलेले नाहीत. जर सुरक्षारक्षक उशिरा पोहोचला तर त्याची चौकशी मात्र केली जाणार आहे."महिला खेळाडूंची साक्ष का महत्वाची असेल....
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैगिंक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. पण हे आरोप जर सिद्ध करायचे असतील तर त्यासाठी महिला खेळाडूंच्या साक्षी महत्वाच्या ठरणार आहेत. पण साक्ष देण्यापासून त्यांना रोखले जात आहे, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात आहे, असा आरोप आता विनेशने केला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/tKiHCL6
No comments:
Post a Comment