Breaking

Friday, August 30, 2024

सातपुड्याच्या अनिलने फक्त ६ दिवसात सर केली दोन शिखरे; आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक! https://ift.tt/AUwT16y

नंदुरबार(महेश पाटील): माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी निवड झाली असताना शिखर चढताना अपघात झाला. त्यामुळे मोहीम अपूर्णच राहिली. त्यातच मागील महिन्यात अचानक पत्नीचे निधन झाले. अशा परिस्थितीतही खचून न जाता असलेल्या सातपुड्यातील छोट्याशा गावातील याने केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील व कियागरी हे दोन शिखर सर करून एक ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट हे गाव आहे. या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही. तेथील अनिल वसावे यांना लहानपणापासूनच डोंगर चढणे आवडायचे. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. त्यासाठी प्रयत्न करू लागले. अनेक चढउतारा नंतर किलीमांजारो. बेस कँप, माउंट कालापथर, माउंट एल्ब्रस माउंट सतोपंथ ही शिखर यशस्वी सर केली. 2023 मध्ये घरची परिस्थिती हालाखीची असताना. मित्रांच्या सहकार्याने अनिल वसावे याची माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी निवड झाली होती. परंतु शिखर ३०० मीटर असताना खराब वातावरणामुळे अनिल याला अपघात झाला होता. यामुळे अनिल वसावे याने मोहिमेतून माघार घेतली होती. दरम्यान संकटाची मालिका अनिल वसावे यांच्यासमोरून जात नव्हती. जुलै 2024 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी स्वतःला सावरत. पतीच्या निधनानंतर महिनाभराच्या आत एवरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंग्नगरी व कियागरी हे दोन शिखर सर केली.

उणे 5 तापमानात रात्री केली अंतिम चढाई

लेह लडाख मधील 6100 मीटर व स्पंगनागरी 6200 मी उंच असलेल्या शिखरावर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे गिर्यारोहक याची यशस्वी चढाई केली. मोहिमेदरम्यान होणारी बर्फवृष्टी, उने 5 तापमान, लागणारा दम हे सगळं सहन करत रात्री एक वाजता अंतिम चढाई केली. 20 ऑगस्ट रोजी सुरू केलेली मोहीम 26 ऑगस्ट रोजी पूर्ण केली. याआधीही गिर्यारोहक अनिल वसावे यांनी किलीमांजारो. माउंट एव्हरेस्ट बेस कँप, माउंट कालापथर, माउंट एल्ब्रस माउंट सतोपंथ ही शिखर यशस्वी सर केली आहेत. आदिवासी समाजातील अनिल वसावे हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहे. त्याचा निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करत आलेले दुःख बाजूला करीत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/j4a7fA8

No comments:

Post a Comment