Breaking

Thursday, August 29, 2024

Goregaon Car Accident : अल्पवयीन मुलाचा प्रताप! मुंबईत पुन्हा हिटअँड रन केस, दुचाकीला दिली धडक https://ift.tt/QwkmYSh

मुंबई : आरे कॉलनी परिसरात एका चारचाकी एसयूव्ही कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एक महिन्यापूर्वीच वरळी हिट अँड रन केस प्रकरण गाजलेले असताना. आता मुंबईत दुसरी अशी हिट अँड रनची केस घडली आहे. गोरेगावातील आरे कॉलनी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयूव्ही चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघात इतका विचित्र होता की दुचाकीस्वार जोरात आदळला गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसयूव्ही चालवत असलेला चालक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती मिळत आहे. कारचालकाने दिलेली धडक अतिशय वेगाने देण्यात आली होती. दुचाकीस्वाराला जागीच गंभीर दुखापत झाली. पोलीसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी तपासानंतरच दुचाकीस्वार मृत्यू झाल्याची घोषणा केली. अद्याप चालक कोण आहे याबाबत जास्त माहिती उपलब्ध झाली नाही आहे. पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/sATh2aj

No comments:

Post a Comment