Breaking

Thursday, August 1, 2024

पॅरिसमध्ये इतिहास घडवणाऱ्या स्वप्नील कुसाळेचे प्रमोशन; कांस्य पदकानंतर भारतीय रेल्वेकडून मोठी घोषणा https://ift.tt/bGk84zA

पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कोल्हापूरच्या याने प्रकारात कांस्यपदकाची कामाई करत देशाला तिसरे पदक मिळून दिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत मिळालेली सर्व पदके नेमबाजीत आली आहेत. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ७२ वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूने देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले. खाशाबा यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तीक पदक जिंकणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे ठरले आहेत. स्वप्नीलच्या या यशानंतर त्याच्या गावापासून तो संपूर्ण राज्यात आणि देशात आनंद साजरा केला जात आहे. नेमबाज स्वप्नीलचा आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनी असून धोनी प्रमाणे तो देखील भारतीय रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतोय. त्याच्य या कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने देखील त्याचे अभिनंदन केले आहे. तो सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात टीसी म्हणून कार्यरत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या या यशानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. स्वप्नील पॅरिसवरून परत येताच त्याचा भारतीय रेल्वेकडून सन्मान केला जाईल आणि स्वप्नीलला ऑफिसर म्हणून प्रमोशन दिले जाईल असे यादव यांनी सांगितले. अंतिम फेरीत स्वप्नीलचा सुरुवात खराब झाली होती. त्याने ९.६ गुणांसह सुरुवात केली. १० शॉटनंतर तो सहव्या स्थानावर होता. त्यानंतर त्याने कामगिरी सुधारणा केली अखेरच्या फेरीनंतर त्याने ४५१.४ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले. स्वप्नीलच्या या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून त्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्याशी संवाद साधला. शाब्बास स्वप्नील... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/IZdwYtm

No comments:

Post a Comment