Breaking

Thursday, August 8, 2024

सुवर्णस्वप्न भंगले... नीरज चोप्राचे रौप्यपदकावर समाधान, पाकिस्तानच्या अर्शदला गोल्डमेडल https://ift.tt/GbSdMct

पॅरिस : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निराशा केली आणि भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. नीरजकडून भाला फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बऱ्याच चुका झाल्या, पण दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकला आणि विक्रम रचला. त्याची ही कामगिरी कोणालाही मोडता आली नाही. त्यामुळे अर्शदने यावेळी सुवर्णपदक पटकावले, तर नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या भाला फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याच्याकडून चूक झाली. पहिल्या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमही अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकला आणि ऑलिम्पिक विक्रम रचला. नीरजने त्यानंतर ८९.४५ मीटर भाला फेकला आणि दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर नीरजला अर्शदचा विक्रम मोडता आला नाही आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले.पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत नीरजने सर्वांच्या आशा उंचावल्या होत्या. कारण पात्रता फेरीत नीरजने जो पहिला भाला फेकला तो त्याने ८९.३४ मीटर एवढा लांब फेकला होता. पात्रता फेरीचा निकष हा ८५ मीटरचा होता. नीरजने पहिल्या फेरीत हा निकष पूर्ण केला होता. त्यामुळे नीरजला त्यानंतर भाला फेकण्याची गरज पडली नाही. नीरजने यावेळी विक्रम रचला होता. त्यामुळे निरजकडून अंतिम फेरीच्या आशा वाढल्या होत्या. नीरज आता फायनलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.नीरजकडून भारतीयांना फार मोठ्या आशा होत्या. कारण या ऑलिम्पिकमध्ये भारताने फक्त कांस्यपदक पटकावली आहे. त्यामुळे भारताच्या मेडलचा रंग कधी बदलणार, असा प्रश्न विचारला जात होता. कारण भारताला एकही रौप्य किंवा सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. त्यामुळे भारताच्या पदकाचा रंग बदलू शकतो, असा सर्वांना विश्वास होता.नीरज चोप्रा हे नाव बऱ्याच भारतीयांना टोकियो ऑलिम्पिकपूर्वी माहिती नव्हते. कारण यापूर्वी त्याला एवढी प्रसिद्धी कधीच मिळाली नव्हती. पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी त्याने गाजवली आणि त्यानंतर तो प्रथम प्रकाशझोतात आला. नीरज त्यावेळी अंतिम फेरीत पोहोचला आणि बऱ्याच भारतीयांना त्याचे नाव समजले. त्यानंतर नीरजने जेव्हा सुवर्णपदक पटकावले तेव्हा तो करोडोंच्या गळ्यातील ताइत झालेला होता. नीरज चोप्रा आणि सुवर्णपदक, असे समीकरण भारताने मनाशी पक्के बांधलेले होते. त्यामुळे नीरजचा सामना भारतीय वेळेनुसार मध्य रात्री होणार असला तरी त्याला पाठिंबा देण्यासाठी भारतीय सज्ज होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/EQIRH06

No comments:

Post a Comment