Breaking

Saturday, August 31, 2024

नदी घाटावर भेटायला बोलवले; विवाहित महिलेची हत्या करून प्रियकराने केला मित्राला फोन, नंतर उचलले टोकाचे पाऊल https://ift.tt/IuPHibo

नांदेड(अर्जुन राठोड): एका प्रियकराने प्रियसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबधातून एका ४० वर्षीय महिलेचा तिच्याच २८ वर्षीय प्रियकराने खून केला आणि त्यानंतर त्याने आपल्या गावी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. हत्येपूर्वी प्रियकराने महिलेला भेटण्यासाठी शहरातील नदी घाटावर बोलावला होता. दोघात वाद झाला. या वादातून आरोपीने हे कृत्य केले. सतीष आलेवाड असे मयत आरोपीचे नाव आहे. नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील सतीष रामराव आलेवाड हा नांदेड शहरातील एका खाजगी रक्तपेढी मध्ये कामाला होता. याच ठिकाणी नोकरी करणाऱ्या विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबध जुळले. सदरच्या विवाहित महिलेला दोन मुलीही आहेत. काही वर्ष त्यांचा काळ सुखाने गेला, मात्र त्यांच्यात कटूता निर्माण झाली. दोघात नेहमी वाद होतं होते. शनिवारी पहाटे सतीष हा गावाकडून नांदेड शहराकडे आला. त्यानंतर त्याने बंदाघाट येथील नदी घाटावर बोलवले. महिला देखील त्याला भेटण्यासाठी गेली. यावेळी दोघात वाद सुरु आणि या वादातून सतीष याने महिलेच्या पोटात चाकू भोसकून खून केला. घटनेनंतर तो मोटारसायकलने पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी हा आपल्या गावी लालवंडी पोहचला. शेतात जाऊन त्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीष तरुणाने गळफास का घेतली हे सुरुवातीला कोणालाच समजत नव्हतं, मात्र पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे गावात पोहचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. देवाणघेवाण वरुन त्यांच्यात वाद सूरु होते, अशी माहिती आहे. दरम्यान, घटनेनंतर सतीष आलेवार याने आपल्या एका मित्राला फोन करुन खुन केल्याचं सांगितले. मी ही आत्महत्या करणार आहे, असे देखील त्याने आपल्या मित्राला सांगून फोन बंद करुन टाकला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/umvVbdB

No comments:

Post a Comment