Breaking

Friday, August 23, 2024

सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम, नारपार नदीजोड प्रकल्पासाठी उन्मेश पाटील यांचं जलसमाधी आंदोलन https://ift.tt/rocK83Y

निलेश पाटील, जळगाव : राज्य सरकार खोटी कागदपत्र देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. माजी खासदार उमेश पाटील यांचे गेल्या १२ ते १३ तासापासून जलसमाधी आंदोलन नदीपात्रात सुरू आहे. वारंवार आम्ही यासाठी निदर्शने केली, आंदोलने केली, ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढला, मात्र हे गेंड्याच्या कातडीचे सरकार, उंदराच्या पोटाचे हे सरकार असल्याने आम्ही नारपार संदर्भात प्रशासकीय मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन सुरू राहणार असल्याचं, उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.नारपार योजना ही आमची हक्काची असून आमचे पाणी गुजरातला वळवण्याकरता नारपार गिरणा खोरे योजना केंद्र सरकारने रद्द केल्याचे पाप केले आहे. गुजरात धार्जिणे राज्य सरकार तोंडावर बोट हाताची घडी घालून बोटचेपी भूमिका घेत आहेत. ही भूमिका गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषचा तीव्र उद्रेक झाला आहे. शुक्रवारी गिरणा नदी पात्रात अकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलनात माजी खासदार उन्मेश पाटील बसलेले आहे. मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांसह आंदोलन सुरू असून नारपार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही. अशी तीव्र भावना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी मेहुणबारे ता. चाळीसगांव येथील गिरणा नदीच्या पुलाजवळील पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी गिरणेच्या प्रवाहात उतरून प्रचंड घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामध्ये नारपार गिरणा खोरे बचाव कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रचंड घोषणाबाजीने हायवेवरून जाणारे वाहन चालक, मोटरसायकल चालक, ग्रामस्थ यांचे आंदोलनाने लक्ष वेधले जात असून मुसळधार पावसात तिरंगा हातात घेऊन शेतकरी सामील झाल्याने आंदोलनाची आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे.खासदार उन्मेश दादा पाटील हे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या सदस्यांसह गिरणा नदीत जलसमाधी साठी ठाण मांडून बसले असून त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नदीच्या पात्रातून बाहेर येणार नाही. हल्ला नसूनही आंदोलन सुरू राहणार आहे. गिरणा खोरे समृद्ध करण्यासाठी नारपार योजना महत्त्वाची असताना वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन देऊन पाठपुरावा करून केंद्र सरकारमध्ये लोकसभेत प्रश्न उचलून धरला,आमदार असताना विधानसभेत प्रश्न उचलून धरला तरी देखील शासनाने याविषयी गंभीर न राहता गुजरात राज्याला फायदा होईल म्हणून नारपार योजना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी रद्द केली आहे. आमच्या हक्काचे पाणी गिरणा धरणात सोडल्यास चाळीसगाव पाचोरा भडगाव एरंडोल पर्यंतचा सिंचनाचा अनुशेष भरून निघणार आणि गिरणा खोरे समृद्ध होणार असून आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

प्रशासनाचा हलगर्जीपणा

नारपार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन, पाठपुरावा, आंदोलन करुन देखील आजच्या जलसमाधी आंदोलनाबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप उसळला असून जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात राहणार असून हे आंदोलन रात्री देखील सुरु राहणार असल्याने गिरणा खोऱ्यात प्रचंड असंतोष पसरला, असल्याचे उन्मेश पाटील यांनी सांगितले


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/U7cNEHa

No comments:

Post a Comment