Breaking

Wednesday, August 7, 2024

पत्नी रूक्सनाचा 'त्या' हत्येत सहभाग; अर्शदचा काटा काढताना बेल्जियम येथील व्यक्तीला व्हीडीओ कॉल https://ift.tt/se1RTfb

मुंबई (दीपेश मोरे): पायधुनी येथे दोन मूकबधिर तरूणांनी आपला मूकबधिर मित्र अर्शद शेख याची केलेली हत्या हा एक कट असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या कटामध्ये अर्शद याची पत्नी रूक्सना हिचाही सहभाग आढळला असून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिला अटक केली आहे. रूक्सना हिचे पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हे हत्यांकाड घडले. पायधुनी येथे जय चावडा याने अर्शद याला दारू पिण्यासाठी बोलावून मित्र शिवजीत सिंग याच्या मदतीने त्याची हत्या केली. हातोड्याने क्रूरपणे ठार मारल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेसने जाण्याच्या प्रयत्नात असताना जय याला दादर रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यानंतर उल्हासनगर येथून शिवडीत याला अटक करण्यात आली. ही हत्या शिवजीत याने केल्याचे भासविण्यासाठी जय याने हत्या करताना त्याचे चित्रिकरण केले होते. याचवेळी बेल्जियम येथील एका व्यक्तीला व्हीडीओ कॅालही करण्यात आला होता. ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. तपासादरम्यान जय चावडा आणि अर्शद याची पत्नी रूक्सना यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने उलटसुलट प्रश्नांचा भडीमार करीत पोलिसांनी रूक्साना हिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिचाही या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. विवाहबाह्य संबंधांच्या मध्ये येत असल्याने अर्शद याचा काटा काढण्यात आल्याचे आतापर्यंत तपासातून दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अन् तुतारी एक्सप्रेसचा प्रवास रविवारी दादर रेल्वे स्थानकात जय चावडा आणि शिवजीत सिंग हे दोघे तुतारी एक्सप्रेसने अर्शद शेखचा मृतदेह घेऊन जात होते. मृतदेह ठेवलेली ट्रॉली बॅग इतकी जड होती की त्यांना ती उचलता येत नव्हती. त्याच बॅगेच्या खाली रक्ताचे थेंब दिसल्याने उपस्थित ड्युटीवरील आरपीएफ जनानांनी बॅघ उघडली तर त्यांना मृतदेह सापडला होता. रेल्वे प्रवासात बॅग पूलावरून ढकलून देण्याची त्यांची योजना होती. दादर रेल्वे स्थानकावर दोघांपैक एकाने पळ काढला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/rYiaTnt

No comments:

Post a Comment