Breaking

Tuesday, September 3, 2024

रोहित आणि विराटच्या भविष्याचा निर्णय फक्त १८ सामने खेळलेला खेळाडू घेणार, बीसीसीआयचा अजब निर्णय https://ift.tt/PuH93Nm

मुंबई : बीसीसीआयचा एक अजब निर्णय आता समोर आला आहे. जो खेळाडू भारतासाठी फक्त १८ सामनेच खेळला, तो आता आणि यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या भविष्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे भारताच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असेल.गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघात अजब निर्णय घेण्याची परंपरा सुरु झाली आहे. गंभीर यांनी भारतीय संघात आल्यावर काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंची निवड कशी केली जाईल, याबाबत काही गोष्ट समोर आल्या आहेत. बीसीसीआयने आता आपल्या चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.भारतीय संघ आता बांगलादेशबरोबर दोन हात करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या कसोटी मालिका होणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंना निवडण्याची जबाबदारी आता भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रावर असेल. कारण बीसीसीआयने आता अजय रात्राची निवड भारताच्या निवड समितीमध्ये केली आहे. यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोला हा भारताच्या निवड समितीमध्ये होता. पण आता अंकोलाला बाहेर केले असून त्याच्या जागी अजय रात्राची निवड केली आहे. अजय रात्राने भारतासाठी ६ कसोटी आणि १२ वनडे सामने खेळले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे कमी सामने खेळणार खेळाडू आता रोहित आणि विराट यांच्या भविष्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयला काही चाहत्यांनी ट्रोल केले आहे.अजय रात्रा हा भारताकडून एकही टी २० सामना खेळू शकला नाही. भारताचा खेळाडू म्हणून अजय रात्राची कारकिर्द चांगली फुलली नाही. कारण अजयला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. त्यामुळेच त्याला फक्त सहा कसोटी सामने खेळता आले, तर १२ वनडे सामन्यांत तो भारताकडून खेळू शकला. त्यानंतर अजयने काही स्थानिक संघाकडून प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्यानंतर आता अजय थेट भारताच्या निवड समितीमध्ये दाखल झाला आहे.बीसीसीआयने आता भारताच्या संघाबाबत एक मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अजय भारताच्या निवड समितीमधील सदस्य म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. हा या निवड समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अजित आगरकरच्या समितीमध्ये आता अजयची निवड झाली आहे. अजय हा गुरुवारपासून आपली जबाबदारी सांभाळणार आहे. दुलीप ट्रॉफीपूर्वी बीसीसीआयने अजयची निवड केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/syvina2

No comments:

Post a Comment