म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : अन्न व नागरी पुरवठामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत, थेट नांदगावमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. नांदगावमध्ये महायुतीकडून आमदार यांची उमेदवारी जाहीर झाली असताना, भुजबळ यांनी कांदेंविरोधात शड्डू ठोकले आहे. त्यानंतर ‘गद्दार हा शब्द भुजबळांसाठीच आहे,’ अशी तोफ आमदार कांदे यांनी डागली आहे, तर ‘मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी रिंगणात उतरलो आहे,’ असा दावा समीर भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे नांदगावची लढाई लक्षवेधी ठरणार आहे.राज्यात महायुतीत भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. आता, नाशिकमध्ये मात्र महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आता मिठाचा खडा पडला आहे. यापूर्वी पंकज भुजबळ यांनी दोन वेळा नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्या वेळी कांदे यांनी त्यांचा पराभव केला. त्याचा वचपा काढण्यासाठी समीर भुजबळ यांनी कांदे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने ‘भुजबळ विरुद्ध कांदे’ वाद विकोपाला गेला आहे. असताना कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वादाला नवीन फोडणी मिळाली आहे.गद्दार हा शब्द भुजबळांसाठी असून महायुतीत भुजबळ गद्दारी करत आहेत. भुजबळ कुटुंबाने दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. हा खटला मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मी येवल्यातून निवडणूक लढण्यास तयार आहे.- सुहास कांदे, आमदारमतदारसंघात भयभीत वातावरण आहे. मी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहावे, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.- समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार, नांदगाव
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/8Ny1HVY
No comments:
Post a Comment