Breaking

Thursday, November 21, 2024

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री होणार आहेत का? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं https://ift.tt/2ZDJq1W

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबरला मतदान पार पडले आहे. निकाल लागायला आता अवघे काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रिपदावरून भाष्य करू लागलेत. महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वात सरकार बनेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी २३ तारखेला सकाळी आपण मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहे. पटोलेंना हायकमांडने सांगितलं असेल तर सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर करायला हवं असं म्हणत राऊतांनी टोला लगावला होता. अशातच यावर विरोधी पक्षनेते यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.नाना पटोले यांनी मी मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार निर्णय घेऊ, माध्यमांनी प्रश्न विचारल्याने संजय राऊतच्या तोंडून असा शब्द निघाला असेल. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचय असं कधीच म्हटलेलं नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी वडेट्टीवारांनी मविआच्या किती जागा येणार यावरही भाष्य केलं. एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल नसतात त्यामुळे 23 तारखेची वाट पहा, मी यावर जास्त भाष्य करणार नाही. अशा कंपन्या काम करत असतात त्यांचे अंदाज वर्तवत असतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 165 जागा जिंकत आहे आणि 23 तारखेला सत्ता स्थापन करू असं वडेट्टीवारांनी सांगितलं.खासदार प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटामधील वादावर दोन्ही पक्षाचे हाय कमांड लक्ष घालत आहे, त्यावर चांगला मार्ग काढला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र असल्यावर अशा गोष्टी होत असतात, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. पुढील काळात सरकारमध्ये हातात हात घालून एकत्र आपल्याला काम करायचे आहे त्यावर हाय कमांड नक्की तोडगा काढतील, असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला. दहा वर्षानंतर पहिल्यांदा भाऊबीज केली, दहा वर्षात कधी भाऊबीज केली नाही. महागाईचा बोजा किती टाकला दीड हजारात काय होणार हे आमच्या लाडक्या बहिणीला माहित आहे. आम्ही गृहलक्ष्मी योजनेद्वारे 3000 देणार आहोत त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केलं त्याचा आम्हाला फायदा होणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/gkrm1RE

No comments:

Post a Comment