Breaking

Saturday, November 2, 2024

विदेशी पाहुण्यांचा भारतातून काढता पाय, १.१३ कोटी घेऊन चीनमध्ये पळाले पण आता ड्रॅगनचाच बाजार उठला https://ift.tt/CPVStH9

मुंबई : भारतीय शेअर बाजारात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) विक्रीचा सपाटा सुरूच आहे. भारतीय बाजाराच्या इतिहासात परदेशी गुंतवणूकदारांनी एकाच महिन्यात एवढा पैसा काढून घेण्याची ही पहिलीच वेळ असून चीनमधील वाढती गुंतवणूक त्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. विदेशी पाहुण्यांनी ऑक्टोबर महिन्यात भारतीय बाजारात मोठी विक्री केली आणि १,१३,८५८ कोटींचे समभाग विकले जी एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे मात्र याच काळात तेच लोक प्राथमिक बाजारपेठेत सक्रिय खरेदीदार राहिले. दुय्यम बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना त्यांनी प्राथमिक बाजारात १९,८४२ कोटींची गुंतवणूक केली.विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पायविदेशी गुंतवणूकदार भारतात विक्री आणि चीनमध्ये खरेदी करण्याचे धोरण अवलंबत होते मात्र आता चिनी बाजार पुन्हा एकदा दबावाखाली आल्याचे दिसत आहे. चिनी शेअर्समधील तेजी कमी होत असून अलीकडे शांघाय आणि हँगसेंग निर्देशांक खाली आले. FPIs च्या वर्तनातील अशा विरोधाभासाबद्दल जिओजित फायनान्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले की प्राथमिक बाजारातील समस्या बहुतेक वाजवी मूल्यमापनावर असतात तर बेंचमार्क निर्देशांक उच्च मूल्यांकनावर व्यवहार करतात. FPIs द्वारे सतत विक्रीमुळे बेंचमार्क निर्देशांकातील शिखरावरून सुमारे ८% पडझड झाली तर विदेशी पाहुणे आणखी विक्री सुरू ठेवू शकतात, ज्यामुळे बाजारातील कोणत्याही संभाव्य रॅलीला ब्रेक लागू शकतो.चिनी शेअर बाजाराचा फुगा फुस्सपरंतु भारतीय बाजारातून घसरणीचा कल कायम असूनही वित्तीय क्षेत्रांमध्ये FPIs द्वारे मोठ्या प्रमाणावर विक्री करूनही हे क्षेत्र लवचिक आहे जे स्पष्टपणे दर्शवते की भारतीय समभागांचे मूल्य योग्य आहे कारण विक्री देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांनी घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चीनमध्ये गुंतवत होते कारण चीन सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले होतेत्यानंतर, चिनी बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून आली.मात्र आता पुन्हा एकदा चिनी शेअर मार्केटमध्ये दबाव वाढू लागला असून अलीकडेच शांघाय आणि हँग सेंग निर्देशांक काही दिवसांत प्रचंड घसरले. त्याचवेळी, जागतिक आघाडीवर आता पुढील आठवडाभरात काही दिवस अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरबाजाराची दिशा ठरवली जाईल त्यानंतर अमेरिकन जीडीपीचे आकडे, चलनवाढ आणि फेडचे दर कपात यासारखे मूलभूत घटक बाजाराच्या हालचालीवर परिणाम करतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/sOQ04Sr

No comments:

Post a Comment