Breaking

Saturday, November 2, 2024

SIP मध्ये चुकूनही करू नका या चूका, अन्यथा कमी होऊ शकतो तुमचा फायदा, बंपर रिटर्नचे स्वप्न राहील अधुरे! https://ift.tt/GtHovCn

मुंबई : म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक आजच्या काळात बँक आणि सरकारी योजनेच्या तुलनेत अतिशय फायदेशीर मानली जात आहे. SIP द्वारे () गुंतवणूक पद्धत खूप वेगाने लोकप्रिय झाली असून तुम्ही अगदी कमीत कमी रकमेतूनही SIP सुरू करू शकता आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी जमा करू शकताकारण SIP सरासरी सुमारे १२% देते जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा खूपच चांगला आहे. तसेच चक्रवाढीच्या फायद्यामुळे संपत्तीची निर्मिती वेगाने होते पण, SIP मधील छोट्या चुकांमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. बंपर रिटर्नचे तुमचे स्वप्न अपूर्ण न राहिल याची खात्री करण्यासाठी तुम्ही करू नये त्या चुका समजून घेतल्या पाहिजे.कोणत्याही माहितीशिवाय गुंतवणूककोणतीही SIP सुरू करण्याआधी योग्य संशोधन करणे आवश्यक आहे. योग्य (रिसर्च) संशोधनाशिवाय सुरू केलेली गुंतवणूक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही आर्थिक बाबींमधील तज्ञाची मदत घेऊ शकता. SIP मध्ये व्यत्यय किंवा मध्येच थांबवणेतुम्ही एसआयपी सुरू केली असेल तर ती मध्यभागी थांबवण्याची चूक करू नका किंवा मध्यभागी बंद करू नका ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही.मोठ्या रकमेची SIP सुरू करणेजास्तीत जास्त परताव्याच्या लोभापोटी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू नका. मोठ्या रकमेतून SIP सुरू करणे वाईट नाही पण काही वेळा वेगवेगळ्या परिस्थितींमुळे एखाद्याला मोठ्या रकमेची SIP सुरू ठेवणे शक्य होत नाही म्हणून, मध्येच थांबवावी लागते. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा पूर्ण नफा मिळू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या रकमेची एसआयपी सुरू करण्याऐवजी छोट्या रकमेच्या अनेक एसआयपी सुरू करा. बाजारातील चढ-उतारांमुळे प्रभावितमार्केटमधील तात्पुरत्या चढउतारांमुळे SIP मध्ये अचानक बदल करू नका. तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाला चिकटून राहा विविधीकरणाचा अभावसर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा ज्यासाठी पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांचा समावेश करा.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/829N4aw

No comments:

Post a Comment