मुंबई: 'कौन बनेगा करोडपती'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेता आणि आयपीएस अधिकारी डॉ. सहभागी झाले होते. यावेळी दोघांनीही यश मिळवण्यासाठी घेतलेल्या कष्टांविषयी भाष्य केले. मनोज यांचा संघर्ष तर 'ट्वेल्थ फेल' सिनेमामधूनही पाहायला मिळाला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांनी विविध आठवणीही सांगितल्या. याशिवाय विक्रांतनेही असे म्हटले की, तो २० वर्षे या शोबिझमध्ये आहे आणि तरीही तो अमिताभ यांना पहिल्यांदाच भेटतोय. केबीसीशी संबंधित आठवणींना उजाळा देताना मनोज यांनी म्हटले की, 'यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा शो इतका फायदेशीर ठरेल, असे मला कधीच वाटले नव्हते. शोच्या माध्यमातून UPSC ची तयारी करण्यासाठी आम्ही पान दुकानात किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये उभे राहून रात्री ९ वाजेपर्यंत थांबायचो. अनेकदा वाटायचे की, आमची तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करताच आमची तयारी पुरेशी नसल्याचे लक्षात येई. तोपर्यंत शाळांमध्ये सामान्य ज्ञानाला फारसे प्राधान्य दिले जात नव्हते.' केबीसीमुळे अनेक शाळांमध्ये सामान्य ज्ञानाला महत्त्व दिले गेले, असेही ते म्हणाले. KBC चा हा एपिसोड खूपच चर्चेत आला आहे. यामध्ये मनोज यांच्यासह त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते. एकीकडे मनोज यांनी आयपीएस अधिकारी होण्यामागची आव्हाने सांगितली, तर त्यांच्या आईने तक्रार केली की, त्यांचा मुलगा कधीच कोणत्या सणासाठी आतापर्यंत घरी आलेला नाही. त्या म्हणाल्या की, तो दिवाळी येईल असे वाटते, पण तो कधीच सहभागी झाला नाही. अमिताभ यांच्याकडे या माऊलीने मोठ्या आशेने ही तक्रार केली. त्यावर उत्तर देताना स्वत: मनोज म्हणाले की, 'सर, पोलीस सण साजरे करू शकत नाहीत. मी आजपर्यंत एकही दिवाळी साजरी केलेली नाही. तुम्ही एकदा खाकी घातली की तुमचा कोणताही धर्म किंवा जात नसतो. तुम्ही एक प्रकारे तुमचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करता.' त्यांनी एकही दिवाळी साजरी केली नाही, हे ऐकताच अमिताभ यांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी पुढे म्हटले की, 'ड्युटीचा पत्ताच लागत नाही, १२-१२ तास काम करतो, ३-३ दिवस घरी जात नाही. एका पोलीसवाल्याकडून अशी अपेक्षा ठेवली जाते, जेव्हा अशावेळी संंपूर्ण समाज बाहेर पडतोय आणि आनंद साजरा करतोय, तेव्हा त्या आनंदामध्ये विघ्न येईल असेही काहीही घडू न देणे हे त्याचे काम असते. ते सामाजिक परिवर्तन करणारे लोक आहेत.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/uqvB09Q
No comments:
Post a Comment