Breaking

Friday, November 1, 2024

रवींद्र जाडेजाचा भारतीय संघाला घरचा अहेर, म्हणाला त्या दहा मिनिटांत सर्व काही घडलं, पण दोष... https://ift.tt/nZ52a0L

संजय घारपुरे : ‘अखेरच्या दहा मिनिटांत जे काही घडले, त्याबद्दल व्यक्त होण्यास वेळ कुठे होता. त्या वेळात सर्व काही घडले; पण सांघिक खेळात कोणा एकाला दोष देता येत नाही. प्रत्येकजण चुका करीत असतो. आता उर्वरित फलंदाजांनी आव्हान ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’ रवींद्र जाडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या क्रिकेट कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर आपल्याच संघाला घरचा अहेर दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.चौदा फलंदाज झालेल्या या पहिल्या दिवसअखेर भारतावरील दडपण वाढलेले आहे. ‘पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात आम्ही चांगले खेळलो नाही. तेव्हापासून आम्ही मागेच पडत आहोत. पुण्यातील दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात आमची फलंदाजी चांगली झाली नाही. पहिल्या कसोटीप्रमाणेच या वेळीही ही चूक घडली होती,’ असे जाडेजाने संघाच्या मालिकेतील कामगिरीबाबत सुरुवातीस सांगितले होते. त्यातच त्याला भारतीयांनी अखेरच्या दहा मिनिटांत गमावलेल्या तीन विकेटबाबत विचारण्यात आले. दहा मिनिटांत सर्व काही घडले असे सांगितल्यावर त्याने आव्हानाची जाणीवही जणू सहकाऱ्यांना करून दिली. ‘आता उर्वरित फलंदाजांना छोट्या - छोट्या भागीदारी कराव्या लागतील. पहिल्या डावात अधिकाधिक धावा केल्यासच आम्हाला दुसऱ्या डावात आव्हान ठेवता येईल. उर्वरित प्रत्येक फलंदाजाने संघासाठी उपयुक्त धावा करणे आवश्यकच आहे,’ असे जाडेजा म्हणाला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे पुन्हा तळाच्या फलंदाजांवर दडपण आले आहे. ‘प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याच्यावेळी तळाच्या फलंदाजांवर दडपण असते. आघाडीच्या फलंदाजांनी धावा केल्यावरही त्या वाढवण्याचे दडपण असणारच. खेळ कायम उंचावणेच भाग असते. या कसोटीत आम्हाला अजूनही संधी आहे, हे मी जाणतो. आम्ही चांगली फलंदाजी केली, तर काहीही अशक्य नाही,’ असे तो म्हणाला. पहिल्या दिवशी खेळणे कमालीचे आव्हानात्मक होते. खूप घाम येत असल्यामुळे चेंडूवर पकड राखणे अवघड जात होते. चेंडू तसेच हात पुसावे लागत होते. अर्थात, सरावाच्या वेळी वातावरण असेच होते. त्यामुळे त्यासाठी तयार होते. मी तरी कधीही प्रतिकूल वातावरणाचे कारण देणार नाही.

रवींद्र जाडेजा म्हणाला...

- भारताच्या फिरकी गोलंदाजांनी जास्त षटके टाकत विकेट घेतल्या, हेच न्यूझीलंडबाबत घडू शकते- पुण्याच्या तुलनेत मुंबईतील खेळपट्टीवरून चेंडू जास्त उसळत आहे तसेच जास्त वळतही आहे- पुण्यातील कसोटीच्या निर्णयात खेळपट्टी निर्णायक, मुंबईतील निकालावर नाणेफेकीचा परिणाम होईल असे वाटत नाही- चेंडू खूप वळत असतानाही काही वेळा विकेटविना रहावे लागते, तर कमी वळत असताना जास्त यश लाभते. - आपल्या कसोटी कारकि‍र्दीत मायदेशी कधीही मालिकेतील पराभव होऊ नये असे वाटत होते, पण नेमके तेच घडले- बारा वर्षात एकही मालिका गमावली नव्हती. त्यात पाचच कसोटी गमावल्या होत्या आणि त्यानंतर...- पराभूत होत असताना छोट्या चुकाही मोठ्या, जिंकताना चुक घडल्यास ती चालून जाते- मी कधीही रिव्हर्स स्वीप खेळत नाही, त्यामुळे त्याबाबत टिपणी कशी करणार


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/91ncTw2

No comments:

Post a Comment