Breaking

Tuesday, November 12, 2024

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पोहरादेवीचे महंत भाजपच्या वाटेवर; योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीत करणार प्रवेश https://ift.tt/P26O5oz

वाशिम (पंकज गाडेकर): बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर आता त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ते पोहरादेवी येथे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. योगी आदित्यनाथ हे पोहरादेवी इथ दर्शनासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाणार आहेत. यावेळी महंत सुनील महाराज हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी व्हायरल केलेल्या एका व्हिडिओ मधून स्पष्ट केल आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज हे शिवसेना (उबाठा) पक्षात होते मात्र उद्धव ठाकरे हे मला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत असे कारण पुढं करत त्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ते भाजप मध्ये प्रवेश करत असल्याने महाविकास आघाडीला याला फटका बसण्याची शक्यता आहे.भाजपने बंजारा समजाचे पोहरादेवीचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करून बंजारा समाजाच्या गाडीचा सन्मान वाढवला त्यामुळे मी हा प्रवेश करणार असल्याचं त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओत म्हटल आहे.पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षात होते आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खा. संजय देशमुख हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आता महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराला याचा फायदा होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/eIqE6Rv

No comments:

Post a Comment