Breaking

Friday, November 29, 2024

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले; एका डावात इतक्या खेळाडूंनी केली गोलंदाजी, पाहा कोणत्या संघाने हा पराक्रम केला https://ift.tt/rB4Gadk

मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील गट क च्या सामन्यात दिल्लीने मणिपूरचा चार गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या यश धुलला त्याच्या नाबाद 59 धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण हा सामना दिल्लीच्या विजयामुळे किंवा मणिपूरचा झालेल्या पराभवामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या लढतीत दिल्ली संघातील सर्व अकरा खेळाडूंनी गोलंदाजी केली. दिल्लीची आगळीवेगळी गोलंदाजी या सामन्याचा चर्चेचा मुद्दा ठरला.या अजब सामन्यात टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विकेटकीपरसह संपूर्ण संघाने गोलंदाजी केली. दिल्लीच्या अकरापैकी चार गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी झाले. नाबाद 59 धावांची खेळी खेळणाऱ्या यश धुलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पण या सामन्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे दिल्ली संघाची गोलंदाजी होय. प्रथम फलंदाजी करताना मणिपूरने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून एकूण 120 धावा केल्या. दिल्लीने 18.3 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करताना सहा विकेट गमावून 124 धावांपर्यंत मजल मारली आणि आपला विजय साकारला. या लढतीत दिल्लीने आपल्या संपूर्ण संघाच्या गोलंदाजी क्षमतेचा वापर करण्याच्या निर्णयासाठी घेतला. टी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेली रणनीती पहायला मिळाली. स्पर्धेत दिल्लीचा संघ ग्रुप क मध्ये असून त्यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व चार पैकी चार लढती जिंकल्या आहेत. ग्रुपमध्ये दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1iuRPBb

No comments:

Post a Comment