मुंबई- बॉलिवूडमध्ये खान कुंटुंब फार महत्वाचं मानलं जातं. पूर्वी सलीम खान आपल्या लेखनाने प्रेक्षकांना भूरळ घालायचे तर आता त्यांच्या मुलगा हा बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जातो. सलमानला आणखी दोन भाऊ आहेत. आणि अरबाज खान मात्र या दोघांना आपल्या वडील आणि भावा प्रमाणे यश मिळवता आले नाही. आज सोहल खानचा वाढदिवस असून तो ५४ वर्षांचा झाला आहे. सोहेल खान सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. काही काळापूर्वी तो त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला आहेत. त्यांच्या घटस्फोटाबद्दल ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते कारण या दोघांनी मंदिरात पळून जाऊन प्रेम विवाह केलेला. पण तरही २४ वर्षांनी यांच्यातलं प्रेम संपले आणि दोघे वेगळे झाले. पण याशिवाय आज आम्ही तुम्हाला सोहेलच्या जुना किस्सा सांगणार आहोत. एकदा सोहेल खानला त्याचे घर गॅलेक्सीसमोर काही लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ सलमान खानने त्याला मदत केली. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण कथा... सलमानने 'द कपिल शर्मा शो'मध्ये सोहेल खानची ही गोष्ट सर्वांसोबत शेअर केली होती. अभिनेत्याने सांगितले होते की एकदा एक माणूस त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करत होता. हे पाहून सोहेल भंयकर संतापला आणि त्याला थांबवण्यासाठी तिथे पोहचला. सलमान पुढे म्हणाला की, जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याच्यासोबत इतरही अनेक लोक तिथे उपस्थित होते हे सोहलला माहीत नव्हते. त्यामुळे सोहेलने त्याला काही सांगताच इतरांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सलमानने सांगितले की, जेव्हा घराबाहेरून भांडणाचे आवाज येऊ लागले, तेव्हा मी सोहेलला वाचवण्यासाठी तिथे पोहोचलो आणि नंतर त्यांना मारून तेथून हाकलून दिले. सोहेल खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ट्युबलाइट हा शेवटचा सिनेमा केलेला. त्यापूर्वी त्याचे मैने दिल तुझको दिया, जय हो, कॉमेडी सर्कस, कृण्षा कॉटेज, हेलो ब्रदर, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AvV4s8r
No comments:
Post a Comment