Breaking

Tuesday, December 10, 2024

सकल हिंदूंची वज्रमूठ! हिंदू नरसंहार रोखा अन्यथा गंभीर परिणाम, मोर्चाद्वारे बांगलादेशला इशारा https://ift.tt/ReUrcnz

नाशिक : हिंदू समाजबांधव आणि अन्य अल्पसंख्याक बांगलादेशात अत्याचाराविरोधात नागरिकांवर होणाऱ्या नाशिककरांनी सोमवारी तीव्र भावना व्यक्त केल्या. शहरातून काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. हिंदू नरसंहार रोखा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा नाशिकमधील सकल हिंदूंनी बांगलादेशला दिला. बांगलादेशला धडा शिकवावा, अशा आशयाचे फलकही यावेळी झळकावण्यात आले. बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दोन दिवसांपूर्वी शहरातील उपनगरांमध्ये मूक मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला होता. सकल हिंदू समाजने देशभर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनीही जागतिक मानव हक्कदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १०) शहरातून मोर्चा काढला. हातात भगवे ध्वज... डोक्यावर भगवी टोपी... त्यावर हिंदू एकता असा संदेश प्रिंट केलेला अन् हातांच्या दंडावर काळी रिबन बांधून सकल हिंदू बांधवांकडून बांगलादेशचा निषेध नोंदविण्यात आला. 'एक है तो सेफ है', 'बटेंगे तो कटेंगे' अशा आशयाचे फलक हाती घेऊन शेकडो हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. बी. डी. भालेकर मैदान येथून हा मोर्चा मार्गस्थ झाला. शालिमार नेहरू उद्यान रेड क्रॉस सिग्नल-महात्मा गांधी रोडमार्गे हा मोर्चा मेहेर सिग्नलपर्यंत पोहोचला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पुढे जात जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबला. हुतात्मा स्मारकाबाहेर चौकसभा घेण्यात आली. त्यात आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, भक्तिचरणदास महाराज, रामसिंग बावरी, अनिकेतशास्त्री, स्वामी कृष्णधन प्रभू, स्वामी नरसिंहकृपा प्रभू, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, व्यंकटेश मोरे, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे आदींसह सकल हिंदू बांधव सहभागी झाले होते. तर देशात वाढेल रोष बांगलादेशात पेटविली जात असलेली हिंदू समाजाची मंदिरे, घरे, दुकाने, तसेच महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध उपस्थितांनी नोंदविला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनांची दखल घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हा मोर्चा हिंदू बांधवांच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी असल्याचे आमदार फरांदे यावेळी म्हणाल्या. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारतात प्रचंड रोष आहे. हे प्रकार थांबवले नाहीत तर हा रोष आणखी वाढेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने संतोष पाटील, मिलिंद कुलकर्णी, नाना दंडगव्हाळ, अमित नगरकर आणि यश खैरे या पाच जणांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. ...या फलकांनी वेधले लक्ष हिंदू नरसंहार रोखा अन्यथा परिणाम गंभीर असतील जात-पात सोडू, हिंदू म्हणून सारे एक होऊ हिंदुओंको न्याय कब मिलेगा ? मानवतेच्या रक्षणासाठी हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही निर्धारपूर्वक उभे आहोत हिंदुओं की आस्था पर हमले क्यों ? आचार्य चिन्मयदास यांची तातडीने सुटका करा


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ErAmSzx

No comments:

Post a Comment