Breaking

Thursday, December 26, 2024

देशाने प्रतिष्ठित नेता गमावला; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर PM नरेंद्र मोदी यांचे ट्विट https://ift.tt/QEGJBym

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केलाय. तसंच भारतानं एक प्रतिष्ठित नेता गमावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंयकाय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट?भारताने आज सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांना गमावलं. सामान्य पार्श्वभूमी असताना त्यांनी देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. अर्थमंत्रीच नव्हे तर त्यांनी सरकारी यंत्रणेत अनेक महत्त्वाच्या पदांचा कारभार पाहिला. अनेक वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आपलं योगदान दिलं, आपली छाप सोडली.संसदेतील त्यांचा वावर अभ्यासपूर्ण होता. आपल्या पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या आठवणी जागवल्या तसंच श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.मनमोहन सिंग यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधील गाहचा. फाळणीनंतर कुटुंब अमृतसरला आले. शिकताना कायम पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या सिंग यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत अर्थशास्त्राचं उच्च शिक्षण घेतलं. प्रशासनात विविध पदांवर काम करून नंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झालेल्या सिंग यांना १९९१ मध्ये पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी अर्थमंत्री केले आणि आर्थिक सुधारणांची ती मुहूर्तमेढ ठरली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9cXgFv3

No comments:

Post a Comment