Breaking

Sunday, January 19, 2025

दोन सामने हरलो, आगामी सामना आम्ही जिंकणारच! संजय राऊतांची फटकेबाजी https://ift.tt/T9QncF2

विनित जांगळे, : ठाण्यातील दोन सामने आम्ही हरलो, आता आगामी महापालिका निवडणुकीचा सामना आम्ही जिंकणारच, असा विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाण्यात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केले. खारकर आळी येथे शिवसेनेच्या (उबाठा) वतीने आयोजित 'हिंदुहद्यसम्राट चषक' क्रिकेट स्पर्धेला राऊत यांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी क्रिकेटपटूंना शुभेच्छा देताना राऊत यांनी जोरदार 'राजकीय फटकेबाजी' केली.ठाण्यातील खारकर आळी परिसरात असलेल्या शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ' हिंदुहद्यसम्राट चषक' क्रिकेट स्पर्धेचे गेल्या १३ वर्षापासून आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाण्यातील जागांवर झालेल्या पराभवाबाबत राऊत यांनी भाष्य केले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा राऊत यांनी आनंद लुटला. त्यांच्या यांच्या हस्ते विजेत्या संघाला ५० हजार रोख पारितोषिक आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी खासदार राजन विचारे, उपशहरप्रमुख व स्पर्धेचे आयोजक सचिन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील उपनेते विजय कदम, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राहुल पिंगळे आदी उपस्थित होते.

आम्ही ठाण्यातले चोर मुंबईत पकडू!

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसलेला हल्लेखोर ठाण्यात पकडला आहे. याबाबत टीप्पणी करताना आम्ही ठाण्यातले चोर मुंबईत पकडू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. याप्रसंगी मुंबई येथे घडलेल्या बोट दुर्घटनेत अनेक नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे आणि चोरांचा पाठलाग करून चोर पकडुन देणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. राऊत यांनी यावेळी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाचे दर्शन घेत अभिवादन केले.

न्यू झरीमरी क्रिकेट क्लबने बाजी मारली

खारकर आळी क्रिकेट क्लब आणि न्यू झरीमरी क्रिकेट क्लब यांच्यात या स्पर्धेचा रविवारी अंतिम सामना रंगला. या सामन्यात न्यू झरीमरी क्रिकेट क्लबने बाजी मारली. राऊत यांच्या हस्ते विजेत्या संघाला ५० हजार रोख पारितोषिक आणि भव्य चषक देण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज राहुल सोणकर, उत्कृष्ट फलंदाज फरमान खान आणि मालिकावीर चेतन आहिरे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी न्यू झरीमरी क्रिकेट क्लबचे निखिल बुडजडे, नितेश (आऊ) पाटोळे उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AzEC3T9

No comments:

Post a Comment