दीपक पडकर, : कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या बारामती शहरातील चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे. यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप (दोघे रा.आमराई,बारामती ), आदित्य राजू मांढरे (रा.चंद्रमणी नगर रा.आमराई बारामती),अनिकेत केशवकुमार नामदास (रा. दीपनगर भवानीनगर ता. इंदापूर जिल्हा पुणे) या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी केलेली आहे.बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता.बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या वरील आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने त्यांची येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे.यापुढे जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर याच पद्धतीची कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
शक्ती नंबर - 9209394917
जागरूक पालकांनी, शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Gr60Mcs
No comments:
Post a Comment