Breaking

Saturday, January 11, 2025

पंतप्रधान मोदींनी गायलं ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ गाणं? काय आहे व्हायरल Video चं सत्य? https://ift.tt/9nam1Zg

नवी दिल्ली : विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो वापरुन बॉलिवूड गायक मुकेश यांचं प्रसिद्ध 'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार' हे गाणं पंतप्रधान मोदींच्या आवाजात ऐकू येत आहे. सोशल मीडियावर काही यूजर्स ही पोस्ट खरी असल्याचं समजून शेअर करत आहेत. गायक मुकेश याचं गाणं पीएम मोदींनी गायल्याचा दावा केला जात आहे. मात्र विश्वास न्यूजने केलेल्या पडताळणीत मोदींच्या नावे व्हायरल होणारा ऑडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय टूलच्या मदतीने तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींनी असं कोणतंही गाणं गायलेलं नाही.

काय आहे व्हायरल होणारी पोस्ट?

फेसबुक डब्ल्यू सिंग याने ६ जानेवारी रोजी एक व्हिडिओ पोस्ट करून दावा केला की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक मुकेश यांनी गायलेल्या गाण्याला आवाज दिला. हे ऐकून साधारणपणे कोणालाही विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. तुम्हीही ऐका.'पोस्टची .

पडताळणीत काय समोर?

विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचं सत्य जाणून घेण्यासाठी गुगल ओपन सर्च टूलचा वापर केला. जर पंतप्रधान मोदींनी असं गाणं गायलं असतं, तर ते नक्कीच मीडियामध्ये चर्चेत आलं असतं, पण अशी एकही बातमी सापडली नाही, जी व्हायरल दाव्याला पुष्टी करेल.विश्वास न्यूजने पडताळणीसाठी पुढे एआय डिटेक्शन टूल ट्रू मीडियाच्या मदतीने व्हायरल पोस्टचा ऑडिओ चेक केला. या टूलमध्ये पंतप्रधानांचा व्हायरल ऑडिओ एआयचा वापर करुन तयार करण्यात आल्याची शक्यता वर्तवली. पडताळणी करण्यासाठी विश्वास न्यूजने YouTube सर्चचा वापर केला. व्हायरल पोस्टवर आधारित कीवर्ड वापरून सर्च केल्यानंतर, एक यूट्यूब चॅनेल आढळलं. नावाच्या या चॅनलवर पंतप्रधान मोदींच्या एआय आवाजाने तयार केलेले अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले.त्याशिवाय या चॅनेलवर २५ डिसेंबर २०२३ पंतप्रधान मोदींच्या एआय जनरेटेड आवाजात गायक मुकेश यांचं 'किसी की मुस्कुराहटो पे हो निसार' हे गाणं अपलोड करण्यात आलं आहे. त्यात लिहिलंय, की ते गाणं AI द्वारे तयार करण्यात आलं आहे. त्याच्या टायटलमध्ये मोदी कव्हर एआय असं लिहिलेलं आहे. विश्वास न्यूजने पडताळणी करताना Modi Music Productions च्या अॅडमिनशी संपर्क केला, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं.

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल पोस्ट फेक असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नावे व्हायरल होणाऱ्या गाण्यातील आवाज त्यांचा नसून तो AI टूलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.(This story was originally published by The , and republished by MT as part of the Shakti Collective.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RtSvPE2

No comments:

Post a Comment