मुंबई : अभिनेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर मोठी खळबळ उडाली. राहुल सोलापूरकर यांनी म्हटले होते की, वेदांनुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणच आहेत. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. आता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. एक मोठा व्हिडीओ शेअर करत त्यांनी माफी मागितलीये. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली. राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचा समाचार यांनी घेत संताप व्यक्त करत मोठी प्रतिक्रिया दिलीये. कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार, असेच थेट आव्हाडांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जो शिकलेला असेल तो ब्राम्हणच असेल असे सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राम्हणही करून टाकतोय. आता याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कानशिलात वाजवली.म्हणजे याच्यातील मनोवाद बरोबर जागा होतो. काय गरज आहे यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची, अगाच समाजामध्ये विष कालवायची?. सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय?. अरे आम्ही म्हणू...कारण तो आमचा बाप आहे बाप...तू म्हणशील का माझा बाप आहे? अरे तुला इतके बोलण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिले. गप्प आपले शब्द मागे घे...शिवाजी महाराजांबद्दलचे पण आणि यांच्याबद्दलचेही...नाहीतर कोणी नाही मारले तुला तरी चालेल मी तुला झोडणार. मी तुला मारणार. बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. लोकांना काय म्हणायचे ते म्हणून द्या. थेट तू त्यांना ब्राम्हण करतोय? आणि अरे तुरे. अरे तुझी लायकी काय कुठे एका चित्रपटात एक भूमिका केली तर तू काय मोठा अमिताभ बच्चन झाला का?. राहुल सोलापूरकर तो काही बोलला आहे त्यातून फक्त वाद निर्माण होऊ शकतो, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यातून फक्त माती भडकू शकतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VyoUYiJ
No comments:
Post a Comment