Breaking

Saturday, February 15, 2025

नवी दिल्ली स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची उसळली गर्दी, चेंगराचेंगरीची स्थिती; अनेकजण अत्यवस्थ https://ift.tt/IEH5cuA

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवल्याची मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. ज्यामध्ये १० पेक्षा अधिक लोक बेशुद्ध पडले आहेत. चेंगराचेंगरीची ही स्थिती पाहून पोलीस आणि अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रयागराजला जाण्यासाठी हजारो लोक जमल्याने मोठी गर्दी झाली, परिणामी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असे प्रशासनाचे म्हणणे आहे. घडले असे की, प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्याला जाणासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दोन विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे येथे हजारो लोकांची गर्दी जमली होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मात्र नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त नाकारले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्दी नियंत्रित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.वृत्तानुसार, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचे आता शेवटचे दिवस असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी जमल्याने परिस्थिती अनियंत्रित झाली. यादरम्यान, सुमारे १५ प्रवाशांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती आहे. ट्रेनला विलंब झाल्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला, असे सांगितले जात आहे. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४-१५ वर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प्रयागराजला जाणाऱ्या हजारो भाविक एकाचवेळी प्लॅटफॉर्मवर जमल्याने त्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे सांगितले जातेय. सध्या चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. परंतु रेल्वेकडून अशी कोणतीही घटना घडल्याचे वृत नाकारण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GpMjuOl

No comments:

Post a Comment