हमासचा सुपडासाफ करण्यासाठी बेंजामिन नेतन्याहूंची मोहिम १८ महिन्यानंतरही सुरुच आहे. तरीही नेतन्याहूंचे लक्ष्य अद्याप पूर्ण झालेले नाही. पण हजारो पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीवरुन समजते की, नेतान्याहूच्या सैन्याने एका इस्रायलीच्या मृत्यूच्या बदल्यात ४२०० पॅलेस्टिनीनींचा खात्मा केला आहे. ही अधिकृत आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात मृतांची संख्या मोजणे आव्हान ठरत आहे. गेले दीड वर्षे गाझा धगधगत आहे. या युद्धात मुले आणि महिलांसह ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्याच्या क्षणिक शांततेनंतर हमासला पुन्हा लक्ष्य करण्यात आले. इस्त्राइलने मंगळवारी हमासवर मोठा हवाई आणि भुहल्ला केला आणि युद्धबंदीला हरताळ फासला. परिणामी गाझातील लोकांना पुन्हा स्थलांतर करण्यास भाग पडत आहे. रविवारी सकाळी इस्त्राइली सैन्याने उत्तर, मध्य आणि दक्षिण गाझाला लक्ष्य केले. हा हल्ला नेतन्याहूच्या सैन्याने गाझावर केलेल्या हल्ल्यापेक्षाही कैकपटीने भीषण होता. त्यामुळे गाझा हादरले आहे. परिणामी युद्धबंदी संपुष्टात आली असून रफाह आणि खान युनिसवर इस्त्राइली हल्ल्याचा प्रभावित झाले आहेत. ज्यामध्ये ३० जणांना प्राण गमवावा लागला. २०२३ मध्ये हमासने गाझामधून इस्त्रायलवर हजारो रॉकेट डागले होते. ज्यामुळे इस्त्रायलमध्ये मोठा विध्वंस झाला. हमासने तेल अवीवला लक्ष्य केले आणि क्षेपणास्त्र डागले, ज्या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्त्रायलने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून समजले की, क्षेपणास्त्र हल्ल्यात १२०० नागरिकांचा मृत्यू झाला. तर कमी अधिक प्रमाात ३०० पोलीस देखील दबावाखाली होते. ज्यापैकी अनेकांना मारण्यातही आले. तर बरेचजण अजूनही हमासच्या दाढेत आहेत. गाझा आणि इस्त्रायलमधील मृतांच्या आकडेवारीची तुलना करता समजते की, इस्त्रायली नागरिकांच्या मृतांच्या बदल्यात कैकपटीने गाझावासियांचा जीव घेतला आहे. एकाच्या बदल्यात मृत्यूचा आकडा पाहता तो तब्बल ४२०० वर जातो. गाझा मधील मृतांची संख्या ५० हजारांवर आहे.तर इस्त्रायलची एकूण संख्या १२०० आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5fezqHk
No comments:
Post a Comment