Breaking

Friday, March 28, 2025

'ही कृती हराम आहे...' सलमानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ बघून मौलानांचा संताप https://ift.tt/fE0ozmO

मुंबई - सध्या त्याच्या 'सिकंदर' या सिनेमामुळे चर्चेत असून त्याचा हाय सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सलमान 'सिकंदर' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच त्याने एक फोटशूट केलं असून त्यामध्ये त्याने हातात घडलेलं भगवं घड्याळ दिसत आहे आणि त्या घड्याळाच्या डायलावर राम मंदिर आहे. यावरून मौलाना संतप्त झाले असून त्यांनी त्याबद्दल व्हिडिओ शेअर केला आहे. सलमान खानने रामजन्मभूमीचं चित्र असलेल्या घड्याळसह त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. सलमान खानने घातलेलं हे घड्याळ 'जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन २' आहे. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. या मर्यादित एडिशनच्या घड्याळावर अत्यंत गुंतागुंतीचे कोरीवकाम आहे, जे राम जन्मभूमीशी जोडलेले घटक आणि भारतीय इतिहासातील त्याचं महत्त्व दर्शवते असं इथोसच्या वेबसाईटने म्हटलं आहे. मात्र, यावरून मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी संतापले आहेत. म्हणाले की, 'सलमान खान देशातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. सिनेमासृष्टीत त्यांच्या नावाची चर्चा कायमच होत असते. मला हे समजलं आहे आणि विचारणा झाली आहे ती त्यांच्या हाती असलेल्या रामजन्मभूमीच्या घड्याळाबाबत. सलमान खान प्रसिद्ध मुस्लिम अभिनेता आहे. त्याचे अनेक चाहते देशभरात आहेत. सलमानचे लाखो फॉलोअर्स आहेत. सलमानने राम मंदिराच्या प्रचारासाठी राम जन्मभूमीचं चित्र असलेलं घड्याळ त्याने हाती घातलं आहे. यावर शरियत नुसार मी हे सांगू इच्छितो की, कुठलाही मुस्लिम माणूस मग तो सलमान खान का असेना तो राम मंदिरांचा प्रचार करत असेल किंवा गैर इस्लामी संस्थांचा किंवा धार्मिक गोष्टींचा प्रचार करत असतील तर ती कृती हराम आहे. अशा माणसाने माफी मागितली पाहिजे.' 'तसं यापुढे गैर मुस्लिम धार्मिक गोष्टींचा प्रचार करणार नाही याचं आश्वासन दिलं पाहिजे. सलमान खानला माझा सल्ला आहे की, शरियतचा त्याने सन्मान करावा. तसंच शरियतने जे सांगितलं आहे ते मान्य करावं. सलमान खानची दिनचर्या जी आहे ती शरियत प्रमाणे असली पाहिजे. त्यांनी नियमांचं पालन केलं तर कयामतच्या दिनी त्यांना उत्तर द्यावं लागणार नाही. राम एडिशनचं घड्याळ सलमान खानने हातात घालणं हे योग्य नाही. असं करणं शरियतनुसार हराम आहे.' असं मौलाना यांनी पुढे म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GSnDd6U

No comments:

Post a Comment