मुंबई:- ठाणे येथे होणाऱ्या "७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरीता" मुंबई शहरने आपले पश्र्चिम व पूर्व चे पुरुष व महिला संघ जाहीर केले. नुकत्याच इराण येथे झालेल्या भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली सोनाली शिंगटेकडे मुंबई शहरच्या पश्र्चिम विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले. या स्पर्धेत सोनालीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. तर सुशांत साईल कडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. साहिल राणे व तनु यांच्याकडे पूर्व विभाचे नेतृत्व सोपविण्यात आले. हे निवडण्यात आलेले संघ आज गुरुवार दि.१९ रोजी स्पर्धेकरीता ठाण्याला रवाना झाले आहेत, अशी माहिती मुंबई शहरचे सचिव विश्वास मोरे यांनी दिली.
निवडण्यात आलेले मुंबईचे सर्व संघ खालील प्रमाणे आहेत...
मुंबई शहर पश्र्चिम विभाग - महिला संघ :- १)सोनाली शिंगटे - संघनायिका, २)साधना विश्वकर्मा, ३)पौर्णिमा जेधे, ४)श्रद्धा कदम, ५)प्रतिक्षा तांडेल, ६)श्रेया साठे, ७)जागृती घोसाळकर, ८)सलोनी नाक्ती, ९)प्राची भादवणकर, १०) आचल यादव, ११)रोझी डिसोझा, १२)सोनाली नाईक.प्रशिक्षक :- भरत मुळे व्यवस्थापिका :- भाग्यश्री भुरके.पुरुष संघ:- १)सुशांत साईल - संघनायक, २)रुपेश साळुंखे, ३)ओमकार मोरे, ४)अजिंक्य कापरे, ५)हर्ष लाड, ६)यश बगल, ७)विनोद अत्याळकर, ८)अवधूत शिंदे, ९)सिद्धेश पिंगळे, १०)सिद्धेश तटकरे, ११)रुपेश कीर, १२)अभिषेक रामाणे.प्रशिक्षक :- संजय सूर्यवंशी व्यवस्थापक :- शिवाजी बावडेकर.मुंबई शहर पूर्व महिला संघ :- १)तनु - संघनायिका, २)सौंदर्या, ३) नंदिनी मौर्या, ४)श्रावणी घाडीगावकर, ५)मेघा कदम, ६)प्रीती हांदे, ७)कादंबरी पेडणेकर, ८)लेखा शिंदे, ९)साक्षी सावंत, १०)साक्षी जंगम, ११)कशीश सावंत, १२)जीवा.प्रशिक्षक:- दिनेश पाटील व्यवस्थापिका:- शुभांगी पाटील.पुरुष संघ :- १)साहिल राणे - संघनायक, २)संकेत सावंत, ३)प्रणय राणे, ४)रुपेश माहुरे, ५)करण सावर्डेकर, ६)जतिन विंदे, ७)शार्दुल पाटील, ८)केतन मापेलकर, ९)अमन शेख, १०)तेजस शिंदे, ११)तेजस टक्के, १२)यश पाटील.प्रशिक्षक:- सुशील ब्रीद व्यवस्थापक:- मिलिंद कोलते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ewdYQg3
No comments:
Post a Comment