Breaking

Wednesday, April 2, 2025

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर शारिरीक संबंध ठेवले अन्... विद्यार्थीनीचा बाप असा फसला शिक्षिकेच्या जाळ्यात https://ift.tt/AUSbZCW

बंगळुरू : कर्नाटकच्या राजधानीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पूर्व प्राथमिक शाळा चालवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थीनीच्या वडिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केले आहे. शिक्षिकेने पीडितेला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी प्रथम शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा शिक्षिकेवर आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी शिक्षिकेविरोधाच गुन्हा दाखल केला असून तिच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. वृत्तानुसार, श्रीदेवी रुडागी असे आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. तर गणेश काळे आणि सागर मोरे हे सहआरोपी आहेत. हे सर्व विजयपुरामधील रहिवासी असल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी श्रीदेवीची बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआऊटमध्ये पूर्व प्राथमिक शाळा आहे, जेथे ती अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असून ती २०२३ मध्ये पीडित राकेश वैष्णवच्या संपर्कात आली होती. ज्यावेळी त्यांनी आपल्या मुलीचे त्या शाळेत अॅडमिशन केले होते.श्रीदेवी आणि राकेश या दोघांमधील संवाद वाढून त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्यांच्यामध्ये फोनाफोनी सुरु झाली आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, राकेशने श्रीदेवीला २ लाख रुपये उधार दिले होते. हे उधारीचे पैसे तिने २०२४ मध्ये परतवण्याचे वचन दिले. यानुसार त्याने जानेवारी २०२४ आपले पैसे परत मागितले. पण श्रीदेवीने टाळाटाळ केली आणि त्याला पैशांच्या बदल्यात शाळेत पार्टनर म्हणून काम करण्याचे सुचवले. त्यांच्यातील संवाद आणखी घट्ट होत गेला. राकेशने तर तिच्याशी बोलण्यासाठी नवा मोबाईल आणि सीम कार्ड देखील खरेदी केला. पुढे त्यांची बातचीत वाढतच गेली. दरम्यान राकेशने उधारीच्या पैशांसाठी तिच्याकडे वारंवार मागणी केली. तिने पैसे परतवण्यालाठी त्याला घरी बोलावले. तो येताच तिने त्याला बोलण्यात गुंतवले आणि बोलता बोलता दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले. एवढ्यावरच न थांबता यानंतरही तिने राकेशकडून ५० हजार रुपये आणखी घेतले. अशाप्रकारे तिची पैशांची दिवसेंदिवस वाढत गेली, जी १५ लाखांवर पोहोचली. यामुळे जेव्हा राकेशने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा ती त्याला शारिरीक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. राकेश यामुळे पुरता भयभीत झाला होता. त्याने आरोपी श्रीदेवीशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तर आपल्या मुलीला सुद्धा त्या शाळेतून काढून गुजरातला आपल्या मूळगावी जाण्याचे ठरवले. श्रीदेवीच्या सूचनेनुसार, तिच्या दोन मित्रांनी पीडित राकेशचे अश्लील व्हिडिओ काढून टाकण्यासाठी त्याच्याकडून २० लाख रुपयांची मागणी केली. आपल्या प्रतिष्ठेला डाग लागू नये म्हणून राकेशने १५ लाख देण्याचे मंजूर केले. तर १ लाख ९ हजार त्यांच्या खात्यात ट्रान्सफर देखील केले. तर उर्वरित पैसे देण्यासाठी राकेशकडे पैसे राहिलेच नव्हते. यामुळे आरोपींनी त्याला घेरले आणि त्याच्यावर पैशांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्या संपूर्ण प्रकाराला कंटाळून अखेर पोलिसांत धाव घेतली. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शिक्षिका आणि तिच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a8iJTer

No comments:

Post a Comment