इरफान शेख, सोलापूर: सोलापूर शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ६८ वर्षाच्या वृद्धावर जेलरोड पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे. यलप्पा कुंचीकोरवे (वय ६८, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेत पंचावन्न वर्षीय नराधमाने चार वर्षाच्या एका चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा शहरात वृद्ध इसमाने घृणास्पद कृत्य केले आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावर अधिकृत माहिती देताना सांगितलं, संशयित वृद्ध नराधमाला ताब्यात घेतले आहे. चार्जशिट तयार केले असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार आणि आरोपीस शिक्षा लावणार.
पैशांचं आमिष दाखवून घृणास्पद कृत्य करत केला विनयभंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता यल्लप्पा कुंचिकोरवे याने घराच्या समोर असलेल्या शाळेतील तीन १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलींना बोलावून घेतले. जवळ घेऊन पैशांचे आमिष दाखवले. त्यांना त्याने घरी येण्यास सांगितले. शिवाय मुली शाळेवरून घरी जात असताना, तो रस्त्यावरील घराशेजारी असलेल्या बोळात थांबला. मुली रस्त्यावरून घरी जात असताना, त्यांना पाहून अश्लील चाळे करीत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. हा घृणास्पद प्रकार शहरात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.घाबरलेल्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला सांगितलं
वृद्ध नराधमाचे घृणास्पद कृत्य पाहून मुली घाबरल्या होत्या. पीडित विद्यार्थिनींनी ताबडतोब मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने मुलींच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिका व पालकांनी ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला, पोलिसांनी तात्काळ मुख्याध्यापिकेची फिर्याद घेतली आणि नराधम यलप्पा कुंचीकोरवे याला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९ व पोक्सो १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uoQyEGv
No comments:
Post a Comment