Breaking

Sunday, April 20, 2025

जंगलात गेला, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ अन् अल्पवयीन कबड्डीपटूने आयुष्य संपवलं, दोन दिवसांनी... https://ift.tt/uF7rplT

रायपूर: एका कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची भयानक घटना घडली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कुम्हारी येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत असताना गळफास लावून घेतला. जंगलात ही घटना घडल्याची माहिती आहे. या कबड्डीपटूने बिलासपूरच्या जंगलात गळफास घेतल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाइव्ह केला, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना ही बातमी मिळाली. यामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

व्हिडिओ समोर येताच पोलीस विभागात एकच खळबळ माजली

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस विभागातही एकच खळबळ उडाली आहे. त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तासनतास जंगलात या अल्पवयीन कबड्डीपटूच्या मृतदेहाचा शोध घेतला. पोलिसांना तो त्याच्या शेवटच्या लोकेशनपासून 10 किलोमीटरच्या परिसरात सापडला. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर या अल्पवयीन कबड्डीपटूचा मृतदेह जंगलातून बाहेर काढला.

बिलासपूरच्या जंगलात तासनतास या अल्पवयीन कबड्डीपटूचा शोध सुरू होता

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बिलासपूरच्या जंगलात तासनतास या अल्पवयीन कबड्डीपटूचा शोध सुरू होता. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. तीन दिवसांपूर्वी कुम्हारी अंतर्गत जंजगिरी येथील अल्पवयीन कबड्डीपटू बिलासपूर येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर 17 एप्रिल रोजी जंगलात गळफास घेतल्याचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता, जे पाहून कुटुंबीयांनी तात्काळ कुम्हारी पोलीस ठाणे गाठले आणि माहिती दिल्यानंतर पोलीस बिलासपूरला रवाना झाले.

कबड्डी खेळायला जातो असं सांगून घरातून निघाला होता, तो परतलाच नाही

कुम्हारी पोलिसांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, मुलाने बिलासपूरच्या जंगलात ज्या मुलाने गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली, त्याची ओळख पटली आहे. १७ वर्षीय कबड्डीपटू जंजगिरी येथील रहिवासी होता. कबड्डी खेळायला जातो असे सांगून तो घरून निघून गेला. या घटनेने मुलाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SPyNres

No comments:

Post a Comment