धरमशाला : पंजाबच्या संघाने आता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा एक निर्णय यावेळी महत्वाचा ठरला. श्रेयसच्या त्या एका निर्णयाने मुंबईच्या संघाला आता धक्का बसला आहे.पंजाबच्या संघाने लखनौच्या संघाची हवाच काढून टाकली. कारण प्रथम फलंदाजी करत असताना पंजाबच्या २३६ धावांच डोंगर उभारला होता. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनीही चांगली सुरुवात केली. त्यावेळी श्रेयस अय्यरने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याला मोठा फटका मुंबईच्या संघाला बसल्याचे आता समोर आले आहे.या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने १० सामने खेळले होते. या १० सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने सहा विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पंजाबचा केकेआरबरोबरचा सामना हा पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे त्याचा त्यांना एक गुण मिळाला होता. त्यामुळे १० सामन्यांनंतर पंजाबच्या खात्यात १३ गुण होते. पंजाबच्या संघाने ३७ धावांनी लखनौच्या संघावर दमदार विजय साकारला. या विजयासह पंजाबच्या संघाला दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता पंजाबच्या संघाचे १५ गुण झाले आहेत. या १५ गुणांसह पंजाबच्या संघाने मुंबईला धक्का दिला आहे. कारण मुंबईच्या संघाचे १४ गुण आहेत आणि विजयासह पंजाबचे आता १५ गुण झाले आहेत. त्यामुळे पंजाबच्या संघाने १५ पॉइंट्स टेबलमध्ये आता दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यासाठी श्रेयस अय्यरचा तो एक निर्णय महत्वाचा ठरला. श्रेयस अय्यरने या सामन्यात एक महत्वाचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने आपल्या दुसऱ्या षटकात मिचेल मार्शला बाद केले होते. साधारण कर्णधार गोलंदाजाला पहिल्या स्पेलमध्ये दोन षटकं देतात आणि दोन षटकं अखेरसाठी राखून ठेवतात. पण श्रेयस अय्यरने यावेळी एक मोठा निर्णय घेतला आणि त्याने अर्शदीप सिंगला तिसरे षटक दिले. या षटकात अर्शदीप सिंगने मॅचविनर निकोलस पूरनला बाद केले आणि त्यामुळेच हा सामना फिरला. या एका निर्णयाचा पंजाबला विजय मिळवण्यात फायदा झाला आणि त्यांनी मुंबईला धक्का दिला.पंजाबच्या संघाचा हा सातवा विजय ठरला आहे. त्यामुळे त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/i78KbAM
No comments:
Post a Comment