धरमशाला : लखनैच्या संघाला पंजाबकडून ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण लखनौला हा सामना ३३ धावांनी जिंकता आला असता. पण लखनौचा संघ हा सामना का जिंकू शकला नाही, नेमकं असं घडलं तरी काय, हे आता समोर आले आहे.पंजाबच्या संघाने फलंदाजीला सुरुवात केली आणि त्याच्यापुढे लखनौच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. कारण तब्बल २३६ धावांचा डोंगर पंजाबच्या संघाने उभारला. पंजाबला हा धावांचा डोंगर उभा करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तो प्रभसिमरन सिंगने. कारण सिंगने या सामन्यात ९१ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली आणि लखनौला ३७ धावांनी पराभूत केले. पण हा सामना लखनौच्या संघाला ३३ धावांनी जिंकता आला असता, पण तसं होऊ शकलं नाही. हे नेमकं काय होऊ शकलं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.ही गोष्ट घडली ती सहाव्या षटकात. त्यावेळी पंजाबची फलंदाजी होती. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग हे दोघे फलंदाजी करत होता. श्रेयस यावेळी पाच धावांवर होता, तर सिंगने यावेळी २१ धावा केलेल्या होत्या. त्यावेळी आवेश खान हा गोलंदाजी करत होता. आवेश खानच्या या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. त्यावेळी आवेश खानच्या चेंडूवर सिंग हा मोठा फटका मारण्यासाठी सरसावला होता. यापूर्वी त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळीही त्याने मारलेला फटका सीमारेषेच्या पार जाईल, असे वाटत होते. पण हा फटका खेळताना त्याचे टायमिंग चुकले. त्यामुळे यावेळी चेंडू हवेत जास्त उडाला. हा चेंडू पकडण्यासाठी लखनौच्या संघाला मॅचविनर निकोलस पुरन हा पुढे सरसावला होता. निकोलस या चेंडूच्या खाली आला होता, त्यामुळे आता सिंग आऊट होणार, असे वाटत होते. पण त्यावेळी पुरनने कॅच सोडली आणि सिंगला जीवदान मिळाले. त्यावेळी सिंग हा २१ धावांवर होता आणि त्यानंतर त्याेन ९१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे पंजाबच्या ७० धावा वाढल्या. लखनौचा ३७ धावांनी पराभव, पण या ७० धावा वगळल्या तर त्यांना ३३ धावांनी विजय मिळवता आला असता.पुरनने जिथे प्रभसिमरन सिंगची कॅच सोडली, तिथेच ही मॅच फिरल्याचे पाहायला मिळाले. कारण सिंगने या जीवदानाचा चांगलाच फायदा घेतला आणि तब्बल ९१ धावांची धमाकेदार खेळी साकारली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/x5238lD
No comments:
Post a Comment