लखनौ : आरसीबीबरोबर तीन संघांचे भवितव्य या एका सामन्यावर अवलंबून होते. पण प्ले ऑफमध्ये नसलेल्या लखनौच्या संघाने या सामन्यात चांगलीच रंगत आणली. ऋषभ पंतच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने २२७ धावांचा डोंगर उभारला होता. आरसीबीचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला, पण त्यांना एकामागून एक धक्के बसत गेले. पण विराट कोहलीवर यावेळी संघाच्या विजयाची आशा होती. तो बाद झाला पण जितेश शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला. जितेशच्या नाबाद ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने लखनौवर सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला या विजयानंतर आरसीबीच्या संघाला गुड न्यूज मिळाली आहे. कारण आता ते प्ले ऑफच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळू शकतात. कारण ते आता दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.लखनौच्या २२८ धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली होती. विराट कोहली यावेळी लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. फिल सॉल्टने यावेळी ३० धावांची खेळी केली आणि तो बाद झाला. पण त्यानंतर कोहलीला साथ देण्यासाठी रजत पाटीदार आला होता. रजत यावेळी १४ धावांवर बाद झाला, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या लायम लिव्हिंगस्टोनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.आरसीबीसाठी महत्वाच्या सामन्यात ऋषभ पंतने त्यांना जोरदार दणका दिला. पंत यापूर्वी चांगल्या फॉर्मात नव्हता. पण या सामन्यात त्याने सर्व कसर भरून काढल्याचे पाहायला मिळाले. कारण पंतने या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांना आपल्यापुढो लोटांगण घालण्यास भाग पाडले. पंत फलंदाजीला मैदानात आला आणि सुरुवातीपासूनच त्यांने गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केली. पंतपूर्वी फलंदाजीला आलेला मिचेल मार्श त्यांच्या मागे पडला होता, एवढी आक्रमक फलंदाजी पंत यावेळी करत होता. लखनौच्या संघाला पहिला धक्का हा २५ धावांवर बसला होता. पण त्यानंतर पंतने मिचेल मार्शच्या साथीने १५२ धावांची धमाकेदार भागीदारी रचली. ही भागीदारी लखनौला दोनशे धावांचा पल्ला गाठण्यासाठी महत्वाची ठरली.मिचेन मार्शनेही यावेळी पंतला चांगली साथ दिली. मार्शने ३७ चेंडूंत ६७ धावांची दमदार खेळी साकारली. पण त्याचवेळी पंतची फलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पंतने यावेळी ६१ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ११८ धावांची नाबाद खेळी साकराली, पंतच्या या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना २२७ धावांचा डोंगर उभारता आला.लखनौचा संघ यापूर्वीच प्ले ऑफच्या बाहेर पडला होता. पण आरसीबीचे समीकरण बिघडवण्याचा त्यांचा यावेळी प्रयत्न असल्याचे दिसत होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qnCUR5r
No comments:
Post a Comment