Breaking

Thursday, June 5, 2025

ना कोणता सिनेमा, ना जाहिरात... एक डील अन् अभिनेत्याने रातोरात कमावले 855 कोटी https://ift.tt/Gl3YkbQ

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य विविध कारणांमुळे चर्चेत येतात. कधी वादग्रस्त कारणांमुळे तर कधी नव्या सिनेमांमुळे हे कपूर कुटुंबीय चर्चेत असतात. आता एका जमिनीच्या व्यवहारामुळे त्यांची चर्चा होते आहे. जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या 'पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांनी मुंबईतील अंधेरीमध्ये असणारी जमीन विकली. याअंतर्गत अभिनेत्याने 855 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जाणून घ्या नेमका काय व्यवहार झाला? रिअल इस्टेट कन्सल्टंट स्क्वेअर यार्ड्सने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, 'या व्यवहारात 9,664.68 चौरस मीटर (2.39 एकर) क्षेत्रफळावर पसरलेले दोन जवळपासचे भूखंड समाविष्य होते.'

8.69 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी

मीडिया रिपोर्टनुसार, या ठिकाणी सध्या बालाजी आयटी पार्क आहे आणि त्यात तीन बांधलेल्या इमारती आहेत. त्यांचे एकूण बांधकाम क्षेत्र 45,572.14 चौरस मीटर (सुमारे 4,90,534 चौरस फूट) आहे. असे समोर आले आहे की, या करारात 8.69 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. मे 2025 मध्ये हा व्यवहार नोंदणीकृत झाला आहे. ही जमीन जपानी कंपनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटरला विकण्यात आली. पॅन्थियन बिल्डकॉन आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपन्यांचे मालकी हक्क ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे आहेत.

किती आहे जितेंद्र यांची नेटवर्थ?

याशिवाय जितेंद्र यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, ते दीर्घकाळापासून दूर असले तरी सध्याच्या घडीला त्यांची संपत्ती 1512 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. सध्या मात्र ते लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यांची लेक 'टीव्ही क्वीन' म्हणून ओळखली जाते. सध्या ती तिच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी'च्या सिक्वेलच्या निर्मितीमध्ये व्यग्र. याशिवाय तिच्याकडे 'बडे अच्छे लगते हैं' आणि '' चे नवीन सीझनदेखील आहेत. याशिवाय जितेंद्र यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूर अलीकडेच 'कपकपी' या हॉरर कॉमेडीमध्ये झळकला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9cKDQXa

No comments:

Post a Comment