संजय आहेर, : जालन्यात दोन चिमुकल्या पोरांचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. जांभळं खाण्याच्या निमित्ताने हे दोन चुलत भाऊ घराबाहेर पडले होते. ते कधीच परतले नाहीत. जांभळ खाण्याच्यासाठी ते दोघे सकाळच्या वेळी घराबाहेर पडले होते. मात्र, गावा जवळील नाल्यात बुडुन या दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना जाफराबाद तालुक्यातील देऊळगावदेवी गावात घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमुकल्या पोरांसोबत नेमकं काय घडलं?
येथील 10 वर्षीय कुणाल राहुल खरात आणि 9 वर्षीय युवराज गौतम खरात अशी या दोन्हीही मयत मुलांची नावं आहेत. ही दोन्ही ही मुलं एकमेकांची सख्खे चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.ही दोन्हीही मुलं जांभळं खाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली होती. यावेळी ते गावाजवळील एका नाल्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही भाऊ पाण्यात बुडाले. उशीर झाला तरी दोन्ही मुलं अजून घरी कसे आले नाही? म्हणून घरातील मंडळींनी दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू केला. यावेळी गावाजवळील नाल्यात दोन्ही मुलांचे मृतदेह ओढ्यातील पाण्यात तरंगताना आढळुन आले. हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती गावात पसरताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी सर्वच गावकऱ्यांनी पाण्यात तरंगणाऱ्या दोन्ही भावांचे मृतदेह नाल्याबाहेर काढले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे तीन सख्ख्या चुलत भावांचा शेततळयातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी या चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YHvupPz
No comments:
Post a Comment