मुंबई- मराठी टेलिव्हिजन विश्वातील सध्याची आघाडीची नायिका हिचा आज वाढदिवस आहे. 8 जुलै 1988 रोजी जन्मलेली जुई आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्याच्या ठरलं तर मग या स्टार प्रवाह वरील मालिकेमुळे ती लोकप्रिय त्याच्या शिखरावर आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपी मध्ये पहिला नंबर धरून असल्याने सायलीची म्हणजेच सुद्धा लोकप्रियता वाढली. टीव्हीवर दिसणाऱ्या खऱ्या आयुष्यातली जुई कशी आहे हे जाणून घेण्याची तिच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिथे ती बऱ्याच चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असते. याशिवाय वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल अनेक खुलासे केले आहे. असेच एकदा अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीबिया पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. यामध्ये प्रामुख्याने तिने आयुष्यातल्या मोठ्या निर्णयाबद्दल सांगितलेले.जुई म्हणालेली, गेली अनेक वर्ष मी अंध मुलांसाठी काम करत आहे. मी देहदान केलं आहे. या सृष्टीमध्ये जेवढं आपण दान करू शकतो ते मी करण्याचा प्रयत्न करते. 2013 मध्येच मी सगळं दान केलेलं आहे. बदलापूरला प्रगती अंध विद्यालय आहे तिथल्या मुलांसोबत मी बरेच वर्ष असोसिएटेड आहे. अभिनेत्री गडकरीला प्राण्यांची आवड किती आहे हे आता जग जाहीर आहे. ती बरेचदा सोशल मीडियावर सुद्धा प्राण्यांवरचे तिचं प्रेम व्यक्त करत असते. प्राण्यांबरोबर काही चुकीचे होत असेल तर ती लगेच आवाज देखील उठवते. त्यामुळेच एक अभिनेत्री शिवाय समाजाबाबतची कर्तव्यदक्षता हा जुईचा गुण सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतो.जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती या क्षेत्रात अगदी अपघाताने आल्याचं बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगत असते. जुई ही युनिव्हर्सिटी टॉपर होती. त्यानंतर तिने मालिकेसाठी असिस्टंट डिरेक्टर, मी सिनेमांसाठी सुद्धा काम केले आहे. तेव्हाच तिला अभिनयाच्या ऑफर आलेले पण तिने ती नाकारली. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलेले. पुढे एनडी स्टुडिओ मध्ये फिरायला गेलेली असताना अचानक तिला ऑडिशन द्यायला सांगितले आणि तिचे सिलेक्शन झाले. तेव्हा तिला आणि तुझं वीण सख्या रे ही मालिका मिळाली. पुढे तिला पुढचं पाऊल या मालिकेची ऑफर येत होती पण तिला 9-5 जॉब करायचा होता त्यामुळे ती सतत नाकारत होती. मात्र एक दिवशी कंटाळून तिने केव्हा ऑडिशन म्हणून दिली आणि तिचं लीड रोल साठी सिलेक्शन झालं. इथूनच जुईचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिने सरस्वती, वर्तुळ यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केले. बिग बॉस मध्ये ती स्पर्धक म्हणून दिसलेली. त्यानंतर आता ती ठरलं तर मग या भूमिकेमध्ये दिसत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mlxJRsQ
No comments:
Post a Comment