Breaking

Sunday, July 5, 2020

शेअर बाजार; करोनाचा धोका आणि चीनशी संघर्षाचे पडसाद https://ift.tt/2O0vTrA

मुंबई : करोना संसर्ग वाढतच असून त्यातच देशात मान्सून सक्रिय होत आहे. या दोन्हींमुळे अनलॉक प्रक्रियेत व्यवहार सुरू करताना अडथळे निर्माण होत आहेत. याचा परिणाम औद्योगिक उलाढालीवर होत असून त्यामुळे भांडवल बाजाराची आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यातील वाटचाल हे दोन घटक प्रामुख्याने ठरवणार आहेत. याशिवाय टीसीएस कंपनी आपले आर्थिक निकाल याच आठवड्यात ९ जुलै रोजी जाहीर करणार आहे. १० जुलै रोजी औद्योगिक उत्पादनाची माहिती सरकार जाहीर करेल. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रिटेल संशोधन विभागाचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांच्या मते, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल येणे टीसीएसपासून सुरू होईल. म्हणूनच टीसीएसच्या निकालाकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष राहणार आहे. मागील आठवड्यात भारतीय बांडवल बाजारांनी दमदार वाटचाल केली. परंतु या आठवड्यात पुन्हा एका लॉकडाउन होण्याची भीती तसेच अमेरिका व चीन यांच्यात वाढत असलेला व्यापारी तणाव याची छाया बाजारावर राहील, असा अंदाज खेमका यांनी वर्तवला आहे. लडाख सीमेवरील भारत आणि चीनदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात चीनी सामानाला विरोध करणे सुरू आहे. जनतेत ही भावना वाढीला लागत असताना केंद्र सरकार, सरकारी उपक्रम आणि विविध मंत्रालयांनीही चीनच्या औद्योगिक आणि व्यापार धोरणाला धोबीपछाड देणे सुरू केले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर आता अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनीही चीनला धडा शिकवण्याचे ठरवले आहे.भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक नाकेबंदी करत भारताने ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. त्यानंतर देशातील मोठ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घातली जाणार आहे. देशांतर्गत शेअर बाजारात निर्माण झालेली तेजीची लाट शुक्रवारीही कायम राहिली. सकाळी व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर दिवसभर बाजारात खरेदीचा माहोल दिसून आला. त्यामुळे बाजार बंद होताना ते वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १७७.७२ अंकांच्या तेजीसह ३६०२१.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५५.६५ अंकांनी वाढून १०,६०७.३५ च्या पातळीवर बंद झाला. याआधी गुरुवारी दिवसभरात सेन्सेक्सने ६०० पेक्षा अधिक अंकांची झेप नोंदवून ३६००० च्या स्तराला गवसणी घातली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dZRlI0

No comments:

Post a Comment