Breaking

Thursday, January 30, 2025

Fact check: मुस्लिम व्यक्तीने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींना धमकी दिली ? सत्य काय? https://ift.tt/ag5ecZV

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेतात बसलेला एक व्यक्ती पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. याशिवाय जुन्या तलवारी बाहेर काढीन, अशी धमकी देत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती आपले नाव तसीम अहमद सांगत असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. हा व्हिडिओ शेअर अनेकांनी यूपी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सजगच्या टीमने या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली आहे.सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा?हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर शेअर करत जितेंद्र प्रताप सिंह नावाच्या व्यक्तीने लिहिले आहे , 'नाव तसीम अहमद, पत्ता . तो म्हणतोय की आम्ही रागावलो तर जुन्या तलवारी बाहेर येतील , टिपू सुलतानच्या काळातील, ज्या आम्ही जमिनीत गाडून ठेवल्या आहेत. तो योगीजी आणि मोदीजींना शिव्या देत आहे आणि त्यांना मारण्याचे बोलत आहे. तो योगी-मोदींना धमक्याही देत आहे. आशा आहे की, यूपी पोलिसांना त्याची तलवार लवकरच सापडेल. हेमंत कुमार शर्मा नावाच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, 'ही व्यक्ती आपल्या देशाला आणि मुख्यमंत्री योगी बाबांना वैयक्तिकरित्या शिव्या देत आहे आणि आव्हान देत आहे. कृपया माहिती घ्या. आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की बाबाजींच्या पोलिसांपर्यंत पोहोचेल. तसीम अहमद हा उत्तर प्रदेशचा आहे...'भारत राष्ट्र सेना, शनी, मोहित सैन, रामसिंग पटेल आणि विनय पंडित यांच्या एक्स हँडलवरूनही अशाच प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. काही पोस्ट पहा- व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याचा स्क्रीन शॉट गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोधला. शोध परिणामांमध्ये, आम्हाला सुमारे ७ वर्षे जुन्या YouTube च्या दोन लिंक्स आढळल्या. हा व्हिडिओ ९ जुलै २०१७ रोजी मोहम्मद इरफान नावाच्या यूट्यूब चॅनलवर आणि २८ जुलै २०१७ रोजी शोएब आलम नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. या दोन लिंक्स पहा- निष्कर्षः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरत आहे. व्हिडिओ शेअर करून यूपी पोलिसांकडून कारवाईची मागणीही केली जात आहे. सजगच्या तपासात हा व्हिडिओ ७ वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यावेळी या व्यक्तीवर कारवाई झाली की नाही, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6SGATz8

No comments:

Post a Comment