मुंबई- ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आज म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. १९८० मध्ये उर्मिला मातोंडकरने 'कलयुग' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती शेखर कपूरच्या 'मासूम' चित्रपटात दिसली. त्यानंतर मोठी झाल्यावर तिने १९९१ मध्ये आलेल्या 'नरसिंह' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. आज उर्मिला तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करतेय. उर्मिलाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतल्याच एका शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील रूपारेल कॉलेजमधून फिलॉसोफी विषयात बीएचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण उर्मिलाने पदवीच्या दुसऱ्या वर्षात कॉलेज सोडले. १९९२ मध्ये उर्मिला शाहरुख खानसोबत 'चमत्कार' चित्रपटात दिसली होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटातून उर्मिला मातोंडकरला खरी ओळख मिळाली. यानंतर तिन सत्य, जुदाई, चमत्कार, कुंवारा, जानम समजा करो आणि एक हसीना थी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ६८ कोटींच्या मालमत्तेची मालक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर मुंबई उत्तर भागामधून काँग्रेसची उमेदवार म्हणून उभी होती. उर्मिलाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ती एकूण ६८.२८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. उर्मिलाकडे ४०.९३ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि २७.३४ कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे. याशिवाय, उर्मिला मातोंडकरवर ३२ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहेत. उर्मिला मातोंडकरने २०१६ मध्ये तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या उद्योगपती मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले होते. तिच्या पतीकडे ३२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ३० लाख रुपयांची अचल मालमत्ता होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतल्याचे बोलले जाते. १.२७ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने उर्मिलाकडे १ कोटी २७ लाख ९५ हजार रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. याशिवाय १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणी आणि १७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, उर्मिला मातोंडकरकडे मर्सिडीजसह आणखी दोन कार आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oTRAuGU
No comments:
Post a Comment