आग्रा: ३६ वर्षीय बबिताने गेल्या आठवड्यात मुलाला जन्म दिला. तिची सर्जरीद्वारे करण्यात आली. रुग्णालयाने तिला सर्जरीचे ३० हजार रुपये आणि औषधांचे ५ हजार रुपये असे मिळून ३५ हजार रुपयांचे बिल दिले. बिबिताचे पती (४५) हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते. बिल कसे चुकवावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच रुग्णालयाने त्यांना मार्ग सांगितला. या दांपत्याने रुग्णालयावर खळबळजनक आरोप केला आहे. रुग्णालयाचे बिल चुकते करण्यासाठी मुलाला एक लाख रुपयांत विकावे, असे आम्हाला रुग्णालयानेच म्हटल्याचे या दांपत्याने सांगतले. या दांपत्याचे हे पाचवे मूल आहे. ते उत्तर प्रदेशातील आग्रा येखील शंभू नगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहतात. रिक्षा चालवून शिवचरण यांची रोजची १०० रुपयांची कमाई होते. ही कमाई रोजच्या रोज होते असेही नाही. त्यांचा सर्वात मोठा मुलगा १८ वर्षांचा आहे. तो एका बुटांच्या कंपनीत मजुरी करतो. करोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर त्याचा कारखाना बंद झाला आणि तो बेरोजगार झाला. आशा वर्करने रुग्णालयात नेले बबिताने माहिती देताना सांगितले की, एक आशा वर्कर तिच्या घरी आली. आपण तुझी मोफत प्रसूती करून देऊ असे तिने बिबताला सांगितले. या दांपत्याचे नाव आयुष्मान भारत योजनेत नाही. मात्र असे असले तरी आपण उपचार मोफत करून देऊ, असे आशाने त्यांना सांगितले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रुग्णालयाने सर्जरी करावी लागेल, असे म्हटले. बिबताने २४ ऑगस्ट या दिवशी संध्याकाळई ६ वाजून ४५ मिनिटांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना बिल दिले. या दांपत्याला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाने कागदपत्रांवर त्यांचे अंगठ्यांचे ठसे घेतले. या दांपत्याला डिस्चार्ज पेपर देखील दिले गेले नाहीत. त्यानंतर मुलाला रुग्णालयाने १ लाख रुपयांना खरेदी केले. प्रकरणाची चौकशी होणार: जिल्हाधिकारी हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींना उचित कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी प्रभूनाथ सिंह यांनी सांगितले. रुग्णालयाचे बिल न चुकवता आल्याने बाळाला या दांपत्याला विकावे लागले याची आपल्याला कल्पना असल्याचे नगरपालिकेचे नगरसेवक हरि मोहन यांनी म्हटले आहे. शिवचरण हे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होते, असेही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- रुग्णालयाने केले आरोपांचे खंडण या दांपत्याच्या मुलाला आपण विकत घेतले हा आरोप चुकीचा असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. आपण बाळाला विकत घेतले नसून दत्तक घेतले असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32LTUtB
No comments:
Post a Comment