Breaking

Monday, August 24, 2020

भारतावर हल्ल्यासाठी जैश-ISI यांच्यात बैठक; भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर https://ift.tt/2FKX7l9

नवी दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर संस्था () आणि दहशतवादी संघटना यांच्या (Jaish-E-Mohammed) दरम्यान पाकिस्तानातील रावळपिंडी येथे एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत भारतात दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. (indian intelligence agencies on high alert) मसूद अजहरच्या भावाला भेटले आयएसआयचे दोन टॉपचे अधिकारी २० ऑगस्ट रोजी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अमीर मौलाना अब्दुल रऊफ अशगर (मसूद अजहरचा भाऊ) याने रावळपिंडीत आयएसआयच्या दोन बड्या अधिकाराऱ्यांची भेट घेतली, अशी माहिती मिळत आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अशगरचा भाऊ मौलाना अम्मार हा देखील उपस्थित होता. अम्मारने बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना सोडून देण्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडत एक ऑडिओ प्रसिद्ध केला होता. इतकेच नाही, तर त्याने बालाकोटच्या तालीम-उल-कुरआन मद्रश्यावर हल्ल्याबाबत भारताचा बदला घेण्याचीही धमकी दिली होती. पुलवामा हल्ल्यापूर्वी देखील झाली होती अशी बैठक गुप्तचर यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीमध्ये अब्दुल रऊफ आणि आयएसआयदरम्यान झालेल्या बैठकीची आखणी इस्लामाबादच्या जैश मरकझने केली होती. दरम्यानच्या काळात जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अशगर खान काश्मीरी आणि कारी जरार याने भारतातील हल्ले तीव्र करण्यासाठी आपल्या एका योजनेवर देखील चर्चा केली. या बाबत गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्याच्या एक महिन्यापूर्वी देखील पाकिस्तानाच अशीच बैठक झाली होती, म्हणूनच ही बैठक महत्वाची असल्याचे मानले जात आहे. क्लिक करा आणि वाचा- कोण आहे अशगर खान काश्मीरी आणि कारी जरार? अशगर खान हा काश्मिरी गुरिल्ला फोर्सचा कमांडर आहे. तो या पूर्वी दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या मजलिस-ए-शूरासाठी देखील काम करत होता. तर, कारी जरार पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पॅडचा कमांडर आहे. तो सन २०१६ मध्ये नगरोटा सैन्य छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील आहे. क्लिक करा आणि वाचा- जैशचा सर्वेसर्वा बनला मौलाना अब्दुल रऊफ जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला जीवघेणा आजार जडल्यानंतर मौलाना अब्दुल रऊफ अशगर हाच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे पालन-पोषण करत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांची ज्या टॉप ५ दहशतवाद्यांवर नजर असते त्यांपैकी हा एक आहे. भारताच्या सैनिकी कारवाईत जैशचे अनेक दहशतवादी ठार केल्यामुळे काश्मीर खोऱ्याच दहशतवादी हल्ला करण्यासाठी रऊफ उतावळा झाला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34vSmWU

No comments:

Post a Comment