Breaking

Thursday, October 22, 2020

मोदींच्या बिहारमध्ये आज ३ सभा; एलजेपीवर काय बोलणार? https://ift.tt/2ISeS3v

पाटणा: बिहार विधानसभेच्या राजकीय रणांगणावर (PM Narendra Modi) आज शुक्रवारी उतरत आहेत. पंतप्रधान मोदी आज निवडणूक प्रचाराच्या (Election Campaign) पहिल्याच दिवशी सासाराम, गया आणि भागलपूर येथे तीन सभांना संबोधित करतील. या सभांमध्ये पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री (Nitish Kumar) देखील असतील. मात्र, बिहार निवडणुकीचा प्रचार करत असताना पंतप्रधान मोदी एनडीएपासून वेगळे झालेल्या लोक जनशक्ती पक्षाबाबत (एलजेपी) काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याचे कारण म्हणजे एलजेपीचे नेते (Chirag Paswan) हे बिहार निवडणुकीच्या या संग्रामात पंतप्रधान मोदींच्या नावने आणि नीतीश कुमार यांच्या विरोधात मते मागत आहेत. ( to address three today) बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये मनाप्रमाणे जागा न मिळाल्याने एलजेपी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. चिराग पासवान यांनी जनता दल संयुक्तच्या विरोधात सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. ते नीतीश कुमार यांच्यावर सतत हल्लाबोल करत आहेत. जागा वाटपामध्ये ज्या नेत्यांच्या जागा जनता दल संयुक्तच्या वाट्याला आल्या, त्या जागांवर चिराग पासवान यांनी त्या भाजप नेत्यांना त्या-त्या जागांवर पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे संयुक्त जनता दलाचे १५ बंडखोर उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिराग पासवान म्हणतात, 'मी मोदींचा हनुमान' मात्र, भारतीय जनता पक्ष आणि जनता दल संयुक्तने आपापल्या बंडखोर नेत्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या व्यतिरिक्त पक्षात अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. कारण, भारतीय जनता पक्षाचे सर्व बंडखोर नेते हे मोदी यांच्या कामावरच मते मागत आहेत एलजेपी प्रमुख चिराग पासवान सतत नीतीश कुमार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षावर मात्र ते नरमाईने वागत आहेत. इतकेच नाही, तर चिराग हे स्वत:ला मोदींचा हनुमान मानत आहेत. क्लिक करा आणि वाचा- 'नीतीश कुमार विश्वासघात करणारे' गेल्या वेळेला लालूप्रसाद यादव यांच्या आशीर्वादाने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनले आणि त्यांचाच विश्वासघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने एका रात्रीत मुख्यमंत्री बनले. या वेळी नरेंद्र मोदीचा आशीर्वाद घेऊन ते पुन्हा लालूप्रसाद यादव यांना शरण जाऊ नयेत म्हणजे झाले, अशा शब्दांत चिराग पासवान यांनी नीतीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TfGrWu

No comments:

Post a Comment