मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. अमेरिकेतील इक्विटीत वाढ आणि डॉलरचे मूल्य घसरल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २ टक्क्यांनी वाढले व ते ४१.० डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. कच्च्या तेलातील मागणीतील सुधारणेच्या चिंतेने अर्थकारणावर परिणाम झाला. काही कार्गोनी जकातशुल्क वसूल केल्यामुळे सप्टेंबर २०२० मध्ये चीनची क्रूडची आयात १७.५ टक्क्यांनी वाढली व ती ११.८ दशलक्ष एवढी झाली. चीनकडून मागणी वाढल्याने तसेच जगातील मोठा तेल ग्राहकांनीही कच्च्या तेलाच्या दरांना आणखी आधार दिला. जगातील काही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने तसेच पुन्हा लॉकडाऊनच्या चिंतेने तेलातील नफ्यावर रोख बसली. साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या अडथळ्याने ओपेकने तेलाच्या मागणीतील सुधारणा कमकुवत असल्याचे संकेत दिले. तसेच अमेरिकी क्रूड साठ्यात घट झाल्याच्या अहवालामुळे तेलाच्या दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे. कॅनडामधील अल्बर्टा राज्यात पुन्हा एकदा खनिज तेलाचे साठे खुले करण्यात आले आहेत. यामुळे बाजारात तेलाचे उत्पादन आणि पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार पुढील महिन्यात ७ मोठ्या शेल फॉर्मेशनमधील तेल उत्पादनात १२१००० बॅरलची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/359nN8u
No comments:
Post a Comment