Breaking

Wednesday, December 2, 2020

अक्षय कुमार योगी आदित्यनाथांना भेटला! शिवसेना म्हणते... https://ift.tt/39Ji6lc

मुंबई: उत्तर प्रदेशातील प्रस्तावित फिल्म सिटीच्या संदर्भात बॉलिवूडमधील मंडळींशी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री () मुंबई दौऱ्यावर आहेत. अभिनेता अक्षयकुमार यानं काल त्यांची भेट घेतली. या भेटीवरून शिवसेनेनं अक्षयकुमारला टोला हाणला आहे. ( on ) यूपीत फिल्म सिटी उभारण्याचा चंग योगी आदित्यनाथ यांनी बांधला आहे. त्याची तयारीही सुरू झाली असून मुंबईतील सिनेसृष्टीतील मंडळींशी याबाबत चर्चा करण्यासाठी योगी मुंबईत आले आहेत. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये टीका-टिप्पणी सुरू आहे. योगी यांनी बुधवारी मुंबईत सिनेउद्योगातील काही लोकांशी चर्चा केली. त्यात अभिनेता अक्षयकुमारचाही समावेश होता. अक्षयकुमार योगींना लॅपटॉपवर काहीतरी दाखवत असल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यावरून 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं अक्षयला टोला हाणला आहे. वाचा: ' यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते,' अशी खोचक टिप्पणी शिवसेनेनं केली आहे. राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांशी अक्षयकुमारची जवळीक आहे. त्यात अनेक पक्षातील लोक असले तरी भाजपच्या नेत्यांसोबत अक्षय प्रामुख्याने दिसतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अक्षयकुमारनं पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली होती. राजकारणा पलीकडचे मोदी हा त्या मुलाखतीचा विषय होता. त्यात त्यानं मोदींना त्यांच्या आवडीनिवडींविषयी विचारले होते. त्यावेळी मोदी यांनी मला आंबे खूप आवडतात, असं म्हटलं होतं. त्यावरून त्यावेळी खमंग चर्चा रंगली होती. योगी व अक्षयकुमार यांच्या भेटीच्या निमित्तानं पुन्हा ती आठवण काढत शिवसेनेनं टोला हाणला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33Dan4i

No comments:

Post a Comment