Breaking

Tuesday, December 1, 2020

शिवराजसिंहांच्या मंत्र्यावर मोठा आरोप; भाजपला मत न दिल्याने दलित कुटुंबाला मारहाण https://ift.tt/3mtOko9

शिवपुरी: मध्य प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री आणि पोहरी विधानसभा मतदारसंघातील आमदार राठखेडा (Suresh Dhakad Rathkheda) यांच्या नातेवाईकांवर एका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत (MP ) मंत्र्याचे नातेवाईक भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याबाबत आमच्यावर दबाव टाकत होते, असा या पीडित कुटुंबाचा आरोप आहे. मात्र आम्ही भाजपला मत न देता बहुजन समाज पक्षाला मते दिली होती. यामुळे मंत्र्याचे नातेवाईक आमच्यावर सतत दबाव टाकत होते. यानंतर आता या मंत्र्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला मारहाण केली, असा आरोप पीडित दलित कुटुंबाचा आहे. या मारहाणीनंतर या कुटुंबाने पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात तक्रार दाखल करून मंत्र्याच्या नातेवाईकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत माहिती देताना पीडित कुटुंबातील ज्ञानी यांनी सांगितले की, आम्ही पोटनिवडणुकीत भाजपलाच मत द्यावे यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र आम्ही दबावात न आल्याने आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्यावरच बैराड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आम्ही याची तक्रार मुख्यमंत्री हेल्पलाइनवर केली. त्यानंतर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तक्रार मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकू लागले. आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्ही कडाक्याच्या थंडीत येथेच बसून राहू असे, पीडित कुटुंबाने सांगितले. मंत्री सुरेश धाकड यांच्या नातेवाईक आम्हाला भरपूर त्रास देत असल्याचे दलित कुटुंबातील एका महिलेने सांगितले. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असेही महिला म्हणाली. हे प्रकरण राज्यमंत्र्यांशी संबंधित असल्याने पोलिस देखील या प्रकरणात हात वर करू लागले आहेत. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करू असे सांगू लागले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तसे पाहिले तर राज्यमंत्री सुरेश धाकड यांच्या नातेवाईकांविरोधात ही पहिली तक्रार नाही. या पूर्वी मंत्र्याच्या नातेवाईकाने एक हत्याही केलेली आहे. तसेच पंचायत सचिव असलेल्या भावाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला देखील मारहाण केलेली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JijW20

No comments:

Post a Comment