Breaking

Wednesday, January 27, 2021

अर्थसंकल्प-२०२१ ; जाणून घ्या कधी आणि केव्हा आहे यंदाचे बजेट https://ift.tt/2NEbJqt

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन तिसऱ्यांदा बजेट सादर करणार आहेत.
  1. आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल कधी सादर होणार ?- आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल २०२०-२१ () शुक्रवारी २९ जानेवारी रोजी संसदेत सादर केला जाईल. निर्मला सीतारामन हा अहवाल संसदेपुढे मांडतील.
  2. आर्थिक सर्वेक्षण पाहणीमध्ये कशाचा समावेश असेल ?- आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा अर्थ खात्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. सरत्या आर्थिक वर्षात सरकारने कोणती विकास कामे केली, किती खर्च केला, सरकारने निधी कसा जमवला याचा लेखाजोखा मांडला जातो.
  3. आर्थिक सर्वेक्षण पाहणी कोण तयार करते ?- आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल हा केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनात तयार केला जातो. आर्थिक वर्षातील देशातील प्रगती याचा आढावा यात घेतलेला असतो.
  4. यंदा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी आहे?-यंदाचे अर्थसंकल्प (बजेट) येत्या सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील.
  5. 'बजेट'चे थेट प्रक्षेपण पाहता येईल का ?- होय, केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर केले जाणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभा वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरु होईल. त्याशिवाय अर्थ मंत्रालयाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर देखील याची अद्ययावत माहिती दिली जाईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ciH38z

No comments:

Post a Comment